वाशिम : उन्हाळ्यातील प्रचंड उकाड्याने त्रस्त झालेल्या प्रत्येकाला पावसाने दिलासा मिळाला असून शुक्रवारच्या रात्री जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली. ढगाळी वातावरण कायम राहून शनिवारी देखील दुपारी पाऊस झाला. यामुळे शेतकरी आनंदले असून खरीप हंगामातील पेरणीची वाट काहीअंशी मोकळी झाल्याचा सूर शेतकºयांमधून उमटत आहे.जिल्ह्यात गतवर्षीच्या पावसाळ्यात सरासरी पर्जन्यमानात सुमारे ३० टक्के घट झाली. यामुळे यंदा अल्पावधीतच सर्वदूर भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. दरम्यान, पाऊस वेळेवर आला तरच खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना सुरूवात होईल, असा सूर उमटत असताना वातावरणात १ जूनपासूनच बदल होऊन काहीठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्याने जनजीवन सुखावले आहे. या पावसामुळे नदी-नाले, तलाव अथवा सिंचन प्रकल्पांच्या पाणीपातळीत कुठलीही वाढ होणार नसली तरी अनुकूल वातावरण निर्मितीमुळे खरीप हंगामातील पेरणीचा मार्ग निश्चितपणे मोकळा होणार असल्याचे शेतकºयांमधून बोलले जात आहे.
वाशिम जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 3:53 PM
वाशिम : उन्हाळ्यातील प्रचंड उकाड्याने त्रस्त झालेल्या प्रत्येकाला पावसाने दिलासा मिळाला असून शुक्रवारच्या रात्री जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली.
ठळक मुद्दे१ जूनपासूनच बदल होऊन काहीठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्याने जनजीवन सुखावले आहे.ढगाळी वातावरण कायम राहून शनिवारी देखील दुपारी पाऊस झाला.