गावकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, १० जून रोजी परिसरात पाऊस आल्याने गावातील अरुणावती नदीवरील आनंदवादी, आसोला, पारवा या गावांना जोडणारा पूल वाहून गेला. यावेळी तालुका प्रशासनाचे अधिकारी, आमदार पाटनी यांनी भेट दिली होती व तात्पुरता रस्ता तयार करण्यात येईल, अशी माहिती दिली होती. तसेच विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन सदर काम पूर्ण करावे, अशी मागणी केली होती. मात्र, अध्यापही तात्पुरता रस्ता केला नाही. त्यामुळे शेतकरी, नागरिक यांना त्रास सहन करावा लागत आहे. येत्या सात दिवसांत पुलाचे काम व रस्ता कामाला सुरुवात केली नाही, तर तहसील कार्यालयासमोर गावकरी आमरण उपोषण करतील, असा इशारा निवेदनात दिला आहे. निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य सुधाकर ठोंबरे यांच्यासह शेकडो गावकरी यांच्या सह्या आहेत.
पावसाने वाहून गेलेला पूल ‘जैसे थे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 4:26 AM