वाशिम : दिवसेंदिवस पर्जन्यमानात मोठी घट होत असल्याने शासनाने प्रत्येक कार्यालयाच्या छतावर ‘रेन वॉटर हॉर्वेस्टिंग’ करणे सक्तीचे केले. मात्र, गत दोन ते तीन वर्षांपासून दुष्काळसदृष स्थिती उद्भवत असतानाही याविषयी समाजात कुठेच जनजागृती होत नसल्याचे दिसत आहे. तथापि, आगामी पावसाळ्यापुर्वी प्रशासकीय इमारतींसह शाळा-महाविद्यालये आणि नागरिकांच्या घरांवर ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ची व्यवस्था करून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक मोहीम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्हा मुख्यालय असलेल्या वाशिममध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामीण रुग्णालय, पोलिस स्टेशन, तहसील कार्यालय, भूमिअभिलेख कार्यालय, पंचायत समिती, नगर पालिका , ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, विश्रामगृह, बसस्थानक अशा सर्व ठिकाणच्या छतांवर ‘रेन वॉटर हार्वेस्टींग’ करणे अनिवार्य आहे. मात्र, बहुतांश इमारतींवर ही व्यवस्था नसल्याचे दिसून येत आहे. इमारत बांधकामानंतर पडताळणीचा विसर...जिल्ह्यात कुठेही नवीन इमारत बांधकामाला परवानगी देत असताना इमारतीच्या छतावर रेन वॉटर हार्वेस्टिंग करणार असल्याचा करार करणे बंधनकारक आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नाही. यासह बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ‘रेन वॉटर हार्वेस्टींग’ केले आहे की नाही, याचीही प्रशासनाकडून पडताळणी केली जात नाही.
‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ला दिली जातेय बगल; जनजागृती शून्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 3:14 PM
वाशिम : दिवसेंदिवस पर्जन्यमानात मोठी घट होत असल्याने शासनाने प्रत्येक कार्यालयाच्या छतावर ‘रेन वॉटर हॉर्वेस्टिंग’ करणे सक्तीचे केले. मात्र, गत दोन ते तीन वर्षांपासून दुष्काळसदृष स्थिती उद्भवत असतानाही याविषयी समाजात कुठेच जनजागृती होत नसल्याचे दिसत आहे. तथापि, आगामी पावसाळ्यापुर्वी प्रशासकीय इमारतींसह शाळा-महाविद्यालये आणि नागरिकांच्या घरांवर ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ची व्यवस्था करून ...
ठळक मुद्दे प्रशासकीय इमारतींवर ‘रेन वॉटर हार्वेस्टींग’ करणे अनिवार्य आहे.दुष्काळसदृष स्थिती उद्भवत असतानाही याविषयी समाजात कुठेच जनजागृती होत नसल्याचे दिसत आहे. जिल्हा प्रशासनाने व्यापक मोहीम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.