लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - यावर्षी पावसात सातत्य नसल्याचा फटका सर्वांनाच बसत आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसाने काही प्रमाणात पिकांना तारले तर दुसरीकडे २३ आॅगस्टपर्यंत सरासरीच्या तुलनेत १७ टक्के पाऊस कमी पडल्याची नोंद प्रशासनाच्या दप्तरी आहे.१ जून ते २३ आॅगस्ट या कालावधीत जिल्ह्यात ६९१ मीमीच्या सरासरीने एकूण ४१५० मीमी पाऊस पडणे अपेक्षीत होते. प्रत्यक्षात या कालावधीत ४७३ मीमीच्या सरासरीने एकूण २८४२ मीमी पाऊस पडला. ही टक्केवारी ८३ असून, १७ टक्के तूट असल्याचे दर्शविते. २३ आॅगस्टपर्यंत सर्वात कमी पाऊस वाशिम तालुक्यात ६४ टक्के पडला आहे तर सर्वात जास्त पाऊस रिसोड तालुक्यात १३७ टक्के पडला आहे. मालेगाव तालुक्यात ९६ टक्के, मंगरूळपीर तालुक्यात ६३ टक्के, मानोरा तालुक्यात ६६ टक्के, कारंजा तालुक्यात ८० टक्के पाऊस झाला आहे.वाशिम तालुक्यात १ जून ते २३ आॅगस्ट या दरम्यान ६६२ मीमी पाऊस अपेक्षीत होता. प्रत्यक्षात ४२७ मीमी पाऊस पडला असून, २३ आॅगस्टपर्यंत ३६ टक्के तूट होती. मालेगाव तालुक्यात १ जून ते २३ आॅगस्ट या दरम्यान ५९७ मीमी पाऊस अपेक्षीत होता. प्रत्यक्षात ५७३ मीमी पाऊस पडला असून, २३ आॅगस्टपर्यंत ४ टक्के तूट होती.रिसोड तालुक्यात १ जून ते २३ आॅगस्ट या दरम्यान ५०९ मीमी पाऊस अपेक्षीत होता. प्रत्यक्षात ७०१ मीमी पाऊस पडला असून, २३ आॅगस्टपर्यंत हा पाऊस सरासरीपेक्षा ३७ टक्के जास्त पडला.मंगरूळपीर तालुक्यात १ जून ते २३ आॅगस्ट या दरम्यान ५४७ मीमी पाऊस अपेक्षीत होता. प्रत्यक्षात ३५० मीमी पाऊस पडला असून, २३ आॅगस्टपर्यंत ३७ टक्के तूट होती. मानोरा तालुक्यात १ जून ते २३ आॅगस्ट या दरम्यान ५३१ मीमी पाऊस अपेक्षीत होता. प्रत्यक्षात ३५५ मीमी पाऊस पडला असून, २३ आॅगस्टपर्यंत ३४ टक्के तूट होती. कारंजा तालुक्यात १ जून ते २३ आॅगस्ट या दरम्यान ५३६ मीमी पाऊस अपेक्षीत होता. प्रत्यक्षात ४३४ मीमी पाऊस पडला असून, २३ आॅगस्टपर्यंत २० टक्के तूट होती.
पावसाची सरासरी १७ टक्के तूट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 7:06 PM
वाशिम - यावर्षी पावसात सातत्य नसल्याचा फटका सर्वांनाच बसत आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसाने काही प्रमाणात पिकांना तारले तर दुसरीकडे २३ आॅगस्टपर्यंत सरासरीच्या तुलनेत १७ टक्के पाऊस कमी पडल्याची नोंद प्रशासनाच्या दप्तरी आहे.
ठळक मुद्देपावसात सातत्य नसल्याचा फटका सर्वांनाच दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने काही प्रमाणात पिकांना तारले