वाशिम : जिल्हयात पावसाने सरासरी ओलांडली असून १२ ऑगस्टपर्यंत सरासरी ५0३.२३ मि.मि. अपेक्षित पाऊस होता, तो ५१७.१८ मि.मि. झाला आहे. मालेगाव तालुक्यात मात्र पावसाने अद्याप सरासरी ओलांडली नसल्याचे पर्जन्यमान्याच्या नोंदीवरुन दिसून येते. जिल्हयात ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच चांगला पाऊस पडण्यास सुरुवात झाली. ३ ऑगस्ट मध्यरात्रीपासून सुरु झालेला पाऊस ५ ऑगस्ट पर्यंत कुठे कमी अधिक प्रमाणात सुरु होता. या पावसामुळे अडाण नदिला पुरासह प्रकल्पाच्या पाण्यात मोठया प्रमाणात वाढ झाली होती, त्यानंतरही जिल्हयात पाऊस कायम असल्याने अपेक्षित सरासरी पावसाची टक्केवारी ओलांडल्या गेली आहे. जिल्हयात १२ ऑगस्टपर्यंत ५0३ . २३ मि.मि. अपेक्षित पाऊस होता तो ५१७.१८ झाला असून जिल्हयातील मालेगाव तालुका वगळता सर्व तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे. तालुकानिहाय अपेक्षित पाऊस बघता वाशिम तालुक्यात आजपर्यंत ५८२.८८ पाऊस अपेक्षित होता तो प्रत्यक्षात ५८३.७0 बरसला. तसेच मालेगाव तालुक्यात ५३५.६८ अपेक्षित पेक्षा ४0९.२0 मि.मि.च पाऊस बरसला. रिसोड तालुक्यात ४५५.0८ अपेक्षित तर प्रत्यक्षात ५२५.00 , मंगरुळपीर तालुक्यात अपेक्षित ४८४.१८ तर प्रत्यक्षात ५३५ मि.मि., मानोरा तालुकयात अपेक्षित ४७८.५८ मि.मि तर कारंजा तालुक्यात अपेक्षित ४८३ तर प्रत्यक्षात ५0३.७0 मि.मि. पाऊस पडल्याची नोंद आहे. यावरुन मालेगाव तालुका वगळता जिल्हयात पावसाने सरासरी ओलांडली आहे. १२ ऑगस्ट सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्हयात समाधानकारक पाऊस बरसला. यामध्ये वाशिम तालुक्यात २0.२0 मि.मि., मालेगाव तालुक्यात १४.२0 मि.मि., रिसोड तालुक्यात ८७.00 मि.मि., मंगरुळपीर तालुक्यात १५.२0 मि.मि., मानोरा तालुकयात २१ मि.मि., तर कारंजा तालुक्यात ६ मि.मि. पाऊस पडला. वार्षिक सरासरी पावसाच्या तुलनेत प्रत्यक्षात पडलेल्या पावसाची टक्केवारी ६४.७५ टक्के आहे.
पावसाने सरासरी ओलांडली
By admin | Published: August 13, 2015 1:17 AM