शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
2
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
3
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
4
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
5
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
6
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
7
नाशिकमध्ये येऊन गेले सर्वपक्षीय दिग्गज नेते; राष्ट्रीय नेतृत्वापासून सर्वोच्च नेत्यांच्या प्रचारसभा
8
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
9
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
10
NTPC Green Energy IPO: आजपासून ₹१०००० कोटींचा IPO गुंतवणूकीसाठी खुला, काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
11
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा
12
गाजरांमुळे अमेरिकेत भीतीचं वातावरण! सर्व स्टोअरवरून परत मागवले; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
13
दिल्लीत विषारी धुके, ट्रकला प्रवेशबंदी, प्रकल्पांची कामेही स्थगित
14
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
15
सलमानसमोर बोलती बंद, आता Bigg Boss 18 मधून बाहेर आल्यावर अश्नीर ग्रोव्हर काय म्हणाला?
16
IPL 2025 Mega Auction : या ३ भारतीय अष्टपैलू खेळाडूंवर लागू शकते मोठी बोली
17
जो बायडेन यांना तिसरं महायुद्ध हवंय का? 'या' निर्णयावर ट्रम्प यांच्या मुलाने उपस्थित केला प्रश्न...
18
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
19
गुजरातेत रॅगिंगने घेतला एकाचा बळी; साडेतीन तास उभे राहण्याची केली सक्ती
20
Pakistan Latest News पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'

मंगरूळपीर तालुक्यात पावसाच्या सरासरीत वाढ

By admin | Published: June 17, 2017 12:32 AM

मंगरुळ्पीर: तालुक्यात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यात पावसाच्या सरासरीत वाढ झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळ्पीर: तालुक्यात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यात पावसाच्या सरासरीत वाढ झाली आहे. मागील वर्षी जून महिन्याच्या १५ तारखेपर्यंत तालुक्यात ७५.७ मिमी पावसाची नोंद झाली होती. पर्जन्यमापन यंत्रणेकडून प्राप्त माहितीनुसार मंगरुळपीर तालुक्यात यंदा १५ जूनपर्यंत १७३.०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात सर्वाधिक ९६.०० मिमी पाऊस पार्डी ताड परिसरात पडला आहे. त्या खालोखाल मंगरुळपीर शहर परिसरात ९०.०० मिमी, शेलू खु., परिसरात ८७.०० मिमी, कवठळ परिसरात ५८.०० मिमी, धानोरा, खु परिसरात ५७.०० मिमी, आसेगाव परिसरात ५४.०० मिमी, तर पोटी परिसरात २३.०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. मंगरुळपीर तालुक्यात सुरुवातीलाच समाधानकारक पाऊस पडत असल्याने शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण असून, खरिपाच्या पेरणीला त्यांनी वेग दिल्याचे पाहायला मिळत आहे. तालुक्यात नेहमीप्रमाणे यंदाही सर्वाधिक पेरा सोयाबीनचाच राहणार असला तरी, उडीद आणि मूग या पिकाच्या पेऱ्यात लक्षणीय वाढ होण्याचा विश्वास कृषी विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. मागील चार दिवसांत तालुक्यात जोरदार पाऊस पडल्याने कृषी सेवा केंद्रांवर बियाणे, खते खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी उसळत असल्याचे चित्रही पाहायला मिळत आहे.