जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस पडत आहे. हवामान खात्याच्या नोंदीनुसार जिल्ह्यात १ जून ते १२ ऑगस्टदरम्यान ५०१.४ मि.मी. पाऊस अपेक्षित असताना ५७२.५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. हे प्रमाण अपेक्षित सरासरीच्या ११४.२ टक्के आहे. त्यात मंगरुळपीर तालुक्यात अपेक्षित वार्षिक सरासरीच्या ९१ टक्के, मानोरा तालुक्यात अपेक्षित सरासरीच्या ८८ टक्के, मालेगाव तालुक्यात अपेक्षित सरासरीच्या ७९ टक्के, रिसोड तालुक्यात अपेक्षित सरासरीच्या ६८.३ टक्के, वाशिम तालुक्यात अपेक्षित सरासरीच्या ६४.२ टक्के, तर कारंजा तालुक्यात अपेक्षित सरासरीच्या ५८.३ टक्के पावसाची नोंद १२ ऑगस्टपर्यंतच झाली आहे. अर्थात कारंता तालुक्याचे प्रमाण कमी असले तरी मंगरुळपीर, मानोरा आणि मालेगाव तालुक्यात पावसाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा खूप अधिक आहे. कारंजा तालुका वगळता जवळपास प्रत्येकच तालुक्यात पावसाची सरासरी १०० टक्क्यांवर असल्याने विहिरी नदी, नाले दुथडीवर आहेत. तर विहिरी काठोकाठ भरल्याने शेतात पाण्याचा निचराच होणे कठीण झाले आहे.
----
कारंजात पावसाची १४ टक्के तूट
वाशिम जिल्ह्यातील प्रत्येकच तालुक्यात १ जून ते १२ ऑगस्टदरम्यान अपेक्षित सरासरीच्या तुलनेत शंभर टक्क्यांच्यावर पाऊस पडला असला तरी कारंजा तालुक्यात सरासरीच्या तुलनेत केवळ ८६ टक्के पावसाची नोंद झाली आहे. अर्थात या तालुक्यात पावसाची १४ टक्के तूट निर्माण झाली आहे. या तालुक्यात १ जून ते १२ ऑगस्टदरम्यान ४८५.५ मि.मी. पाऊस अपेक्षित असताना केवळ ४२१.२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.