लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : १०, ११ जूनला झालेल्या पावसाचे पाणी शहरातील विविध भागात साचले तसेच ग्रामीण भागातही पाणी साचल्याने आणि रस्ते चिखलमय झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली.रिसोड : रिसोड शहरातील बसस्थानक परिसर, सिव्हील लाईन परिसरातील रस्त्यांवर पाणी साचले. मान्सूनपूर्व कामे व्यवस्थित झाली नसल्याने हा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. नवीन वसाहतीमध्येही व्यवस्थित रस्ते नसल्याने तेथे चिखल साचला आहे. परिणामी, नागरिकांना ये-जा करताना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
भर जहॉगीर येथे रस्ते चिखलमयभर जहॉगीर : पहिल्याच पावसात भर जहॉगीर येथील रस्त्यांचे पितळ उघडे पडले आहे. भर जहागिर येथिल दलीत वस्तीतील रस्ते चिखलमय झाले. यामुळे रहीवाशांची गैरसोय झाली. मागील अनेक वर्षांपासून येथिल दलीत वस्तीवर विकासकामांत अन्याय झालेला आहे. ११ जून रोजी रात्री झालेल्या पावसाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात पाणी साचले होते. नाल्यात केरकचरा साचल्याने पाणी वाहून गेले नाही. परिणाम या परिसरातील अनेकांच्या घरात पुराचे पाणी घुसले. मान्सूनपूर्व कामांना गती देऊन दलित वस्तीत पाणी साचणार नाही, रस्ते चिखलमय होणार नाही, याची दक्षता संबंधित यंत्रणेने घ्यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी १२ जून रोजी केली.