जिल्ह्यात गतवर्षी ६० हजार हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली होती. खरीप हंगामातील दीर्घकालीन असलेल्या या पिकाचे उत्पादनही बऱ्यापैकी झाले होते. इतर शेतमालाच्या तुलनेत या शेतमालाची खरेदी उशिरा सुरू होते आणि आवकही उन्हाळ्याच्या दिवसांतच अधिक होते. यंदा पूर्ण हंगामात तुरीला अपेक्षित असे दर मिळाले नाहीत. आता मात्र शेतकऱ्यांकडील तूर संपली असताना तुरीच्या दरात तेजी आली आहे. शासनाने तुरीला ६००० रुपये प्रतिक्विंटलचे दर घोषित केले असताना तुरीची खरेदी सुरू झाल्यापासून शेतकऱ्यांना अपेक्षित असा दर मिळालाच नाही. सुरुवातीचे दोन महिने, तर तुरीची हमीपेक्षा कमी दरात खरेदी होत असल्याचेही दिसले. आता मात्र शेतकऱ्यांकडील तूर संपत असताना या शेतमालाच्या दरात कमालीची तेजी येत आहे. तुरीला हमीदरापेक्षा ७०० ते ८०० रुपये अधिक दर मिळत आहे.
-----
उडीद, मुगाचे दर हमीपेक्षा कमी
तुरीला हमीदरापेक्षा ७०० रुपयांहून अधिक दर मिळत असताना मूग आणि उडीद या कडधान्यवर्गीय शेतमालाला मात्र हमीपेक्षा कमी दर मिळत आहे. मुगाचा हमीदर ७,१९६ रुपये प्रतिक्विंटल असताना वाशिम येथे ६,११२, कारंजात ६,०००, मंगरुळपीर येथे ६,०२५, रिसोड येथे ६,१६०, मानोरा येथे ५,९००, तर मालेगावात ५,८७५ रुपये प्रतिक्विंटल दराने या शेतमालाची खरेदी होत असून, सोमवारी उडदाला वाशिम येथील बाजार समितीत जास्तीत जास्त ३५०० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाल्याचे कळले.
०००००००००००००००००००००
हंगामाच्या तोंडावर उडीद, मुगाच्या दरात घसरण
उडीद आणि मूग ही खरीप हंगामातील खूप कमी कालावधीची पिके आहेत. या पिकांच्या शेंगा परिपक्व झाल्या असून, काही भागांत उडीद, मुगाच्या काढणीला सुरुवात झाली आहे. या शेतमालाची आवक बाजारात होत असतानाच या शेतमालाच्या दरात घसरण होत आहे. विशेष म्हणजे या पिकांचे क्षेत्र अत्यंत कमी असल्याने मागणी मोठ्या प्रमाणात राहणार आहे. अशा स्थितीत उडीद, मुगाच्या दरात होत असलेली घसरण अनाकलनीय आहे.
०००००००००००००००००००००००००
बाजार समित्यांमधील तुरीचे दर
बाजार समिती - तुरीचे दर
वाशिम - ६,७००
मंगरुळपीर - ६,७३०
कारंजा - ७,०३५
मानोरा - ६,७००
मालेगाव - ६,७५०
रिसोड - ६,७९०