लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड (वाशिम) - कारंजा येथील सैनिक स्व. सुनील ढोपे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे आश्वासन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी २३ आॅक्टोबर रोजी ढोपे कुटुंबियांना दिले. ढोपे कुटुंबियांशी सांत्वनपर भेट घेताना ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत मनसेचे नेते बाळा नांदगावकर, राज्य उपाध्यक्ष राजु उंबरकर, प्रविण मगर, चित्रे व कदम आदींची उपस्थिती होती. गत तीन दिवसांपासून राज ठाकरे हे विदर्भाच्या दौºयावर असून, यवतमाळ येथून कारंजा मार्गे वाशिम येथे जात असताना २३ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता कारंजा शहरातील बायपास परिसरातील झाशीराणी चौकात त्यांचे आगमन झाले. यावेळी कारंजा शहर मनसे पदाधिकाºयांनी ठाकरे यांचे भव्य स्वागत केले. ढोपे कुटुंबियांना न्याय मिळावा म्हणून मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल लुलेकर यांनी राज ठाकरे यांच्यापर्यंत हा विषय पोहचवून सांत्वनपर भेट घेण्याची गळ घातली होती. ११.१५ वाजता दरम्यान त्यांनी ढोपे कुटुंबियांची भेट घेवून सांत्वन केले. यावेळी स्व. सुनील ढोपे यांचा भाऊ ज्ञानेश्वर ढोपे यांनी सुनील ढोपे यांच्या आकस्मिक मृत्यूसंदर्भात घडलेल्या प्रकार कथन केला. त्यावर ढोपे मृत्यू प्रकरणी ढोपे कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण मदत करणार असल्याचे आश्वासन राज ठाकरे यांनी दिले. यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल लुलेकर, रवि मुळतकर, कपिल महाजन, माणिक राठोड, अमोल धाने, अहेमद शेख, सत्येंद्र बंदीवान यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
वाशिम येथे पदाधिकाºयांशी साधला संवादराज ठाकरे यांनी वाशिम येथे विश्रामगृहात मनसे पदाधिकाºयांशी संवाद साधला. यावेळी पदाधिकाºयांनी मनसे जिल्हाध्यक्ष पदाची निवड लवकरात लवकर करावी, अशी गळ घातली. वाशिम जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूत करण्यासंदर्भात चर्चा केली. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा, लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने ठाकरे यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सूचना केल्या. यावेळी मनसेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.वाशिम येथे पत्रकार परिषद टाळलीदरम्यान, २३ आॅक्टोबर रोजी राज ठाकरे हे वाशिम येथे पत्रकार परिषद घेणार असल्याचे निरोप मनसेच्या पदाधिकाºयांनी माध्यमांपर्यंत पोहोचविले होते. स्थानिक विश्रामगृहात पदाधिकाºयांशी संवाद साधल्यानंतर ठाकरे हे पत्रकारांशी संवाद साधतील, असे सांगितले जात होते. मात्र, ठाकरे हे पत्रकार परिषद टाळून थेट अकोल्याच्या दिशेने रवाना झाले.