लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अभ्यासाबरोबरच आता क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थी चमकदार कामगिरी बजावत आहेत. खेळाडू घडविण्यासाठी उत्कृष्ट मार्गदर्शकही तेवढाच महत्वाचा ठरतो. लॉन टेनिसमध्ये राष्ट्रीय मार्गदर्शक होण्याचा बहुमान वाशिम येथे क्रीडा शिक्षक राजदीप मनवर यांना मिळाला आहे. अमरावती विभागातील ते पहिलेच राष्ट्रीय मार्गदर्शक ठरले आहेत. लॉन टेनिस, खेळाडूंचा कल, वाशिमसह विदर्भातील खेळाडूंचे स्थान यासह विविध क्रीडा विषयक बाबींशी मनवर यांच्याशी साधलेला हा संवाद......प्रश्न : लॉन टेनिसमध्ये राज्यात किती राष्ट्रीय मार्गदर्शक आहेत?उत्तर - आॅल इंडिया लॉन टेनिस असोसिएशनव्दारा लॉन टेनिसमध्ये राष्ट्रीय मार्गदर्शकासाठी राष्टÑीय स्तरावर ग्रेड तीनची परीक्षा घेतली जाते. यावर्षी या परीक्षेत महाराष्ट्रातील माझ्यासह केवळ दोन मार्गदर्शक उत्तीर्ण झाले. आतापर्यंत अमरावती विभागात लॉन टेनिसमध्ये राष्ट्रीय मार्गदर्शक होण्याचा मान कुणालाही मिळाला नाही. राज्यात ७ ते ८ मार्गदर्शक आहेत.प्रश्न : यापूर्वी मार्गदर्शक म्हणून जिल्हा, विभाग किंवा राज्यस्तरीय स्पर्धेत मान मिळाला होता का ?उत्तर - दोन वर्षांपूर्वी १९ वर्षाआतील शालेय लॉन टेनिस स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे कोच (प्रशिक्षक) म्हणून सेवा दिली आहे. महाराष्ट्र संघाने यावेळी गोल्ड मेडल मिळविते होते.प्रश्न लॉन टेनिसबद्दल काय सांगाल ?उत्तर - अलिकडच्या काळात दहावीच्या गुणपत्रिकेत क्रीडा गुणांचा समावेश करण्यात आल्याने विद्यार्थी मोठ्या संख्येने क्रीडा क्षेत्राकडे वळत आहेत, ही आनंदाची बाब आहे. इतर खेळांच्या तुलनेत लॉन टेनिसकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी असला तरी अलिकडच्या काळात लॉन टेनिसकडे वाशिम जिल्ह्यातील खेळाडू आकर्षित होत असल्याचे आशादायी चित्र आहे. वाशिम जिल्ह्यातील अधिकाधिक खेळाडू हे लॉन टेनिसमध्ये चमकदार कामगिरी कशी करतील याला प्राधान्य देण्याचा प्रयत्न राहिल.प्रश्न लॉन टेनिस स्पर्धेत खेळाडूंचे स्थान काय ?उत्तर - अलिकडच्या काळात वाशिम जिल्ह्यातील खेळाडू लॉन टेनिस या क्रीडा प्रकारात चांगली कामगिरी करीत असल्याचे दिसून येते. विभाग व राज्यस्तरावर १५ पेक्षा अधिक खेळाडूंनी विविध वयोगट व प्रकारात पदके मिळविली आहेत. वाशिमचे खेळाडू राष्ट्रीय स्तर स्पर्धेत चमकावे याचा प्रयत्न राहणार आहे.
क्रीडा संस्कृती रूजविण्याचा प्रयत्न- राजदीप मनवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2019 5:33 PM