लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राणी पदमावती चित्रपटामध्ये काल्पनिक इतिहास रंगवून राजपूत समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. याबाबत संपूर्ण राजपूत समाजा समाजाच्यावतिने १९ नोव्हेंबर रोजी येथील पुसद नाका वाशिम येथे रास्ता रोको करण्यात आला. यावेळी शेकडो समाजबांधवांची उपस्थिती होती.संजय भंसाली यांनी राणी पदमावती यांच्या नावावर चित्रपट काढला असून या चित्रपटामध्ये काही आक्षेपार्ह मुद्दे आहेत. राजपुत समाजाच्या नव्हे तर सर्वच हिंदु भगीनींचा अपमान केला आहे. राणी पदमावती चित्तोडगडच्या महाराणी होत्या व संपूर्ण भारतात आपल्या शिल रक्षणाकरिता १६००० हजार स्त्रीयासोबत अग्नीमध्ये प्रवेश करुन आपल्या स्त्री पतीव्रतेचे प्रतिक संपूर्ण इतिहासामध्ये त्यांची नोंद आहे. असे असतांना चित्रपटात मसाला भरुन प्रदर्शित करण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी हा रास्ता रोको करण्यात आला. या रास्ता रोको आंदोलनात अखिल भारतीय प्रदेश अध्यक्ष अजयसिंह सेंगर(ठाकुर), जिल्हाध्यक्ष राजेंद्रसिंह ठाकुर, जिल्हा उपाध्यक्ष लखनसिंह ठाकुर, प्रदेश महिला अध्यक्ष सोनाली ठाकुर, बजरंग दल अध्यक्ष मुकेशसिंह ठाकुर, महाराष्टÑ प्रदेश युवा अध्यक्ष मनोजसिंह ठाकुर, प्रदेश उपाध्यक्ष विनोदसिंह ठाकुर, मनोजसिंह रघुवंशी, विशालसिंह ठाकुर, श्यामसिंह ठाकुर, प्रढलादसिंह चौव्हान, अॅड. सज्जनसिंह चंदेल, सुरेश लोध, संजयसिंह बैस, उदयसिंह ठाकुर, आशिष ठाकुर, सुरजसिंह ठाकुर, शंकरसिंह बैस यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी प्रदेश अध्यक्ष अजयसिंहजी सेंगर, लखनसिंह ठाकुर, सोनाली ठाकुर यांच्यासह ईतरही काही बांधवांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच सदर चित्रपट प्रसिध्द करण्यात येवू नये याकरिता चित्रपट निर्माता संजय भंसाली विरोधात नारेबाजी करण्यात आली. यावेळी राजपूत समाजातील बहुतांश बांधवांची उपस्थिती लाभली होती.
राजपूत समाजाने केला पुसद नाक्यावर रास्ता रोको!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 7:37 PM
राजपूत समाजाच्यावतिने १९ नोव्हेंबर रोजी येथील पुसद नाका वाशिम येथे रास्ता रोको करण्यात आला. यावेळी शेकडो समाजबांधवांची उपस्थिती होती.
ठळक मुद्देराणी पदमावती चित्रपट प्रदर्शित न करण्याची मागणी तासभर रस्ता बंद