लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा (वाशिम): येथील शे. इनूस शे. तुराब (वय ४५) या इसमाने गरिब परिस्थितीला कंटाळून अंगावर रॉकेल घेऊन स्वत:ला पेटवून घेतले. यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना २६ नोव्हेंबरच्या रात्री १०.३० वाजता घडली.याबाबत प्राप्त माहितीनुसार, रोजमजूरीवर कुटूंबाचा चरितार्थ चालविणारे शे. इनूस हे गावातीलच जिल्हा परिषद शाळा परिसरात कुडामातीच्या दोन खोल्यांमध्ये वास्तव्याला होते. घटनेच्या रात्री ते एका खोलीत; तर त्यांची पत्नी नेहरूनासाबी ह्या मुलांसह दुसऱ्या खोलीत झोपलेले होते. रात्री १०.३० वाजता अचानक ओरडण्याचा आवाज आल्यामुळे कुटूंबियांसह शेजारी वास्तव्याला असलेले लोकही धावून आले. मात्र, दरवाजा तोडून आत पाहिले असता शे. इनुस हे पूर्णत: जळालेल्या अवस्थेत निपचित पडून असल्याचे आढळून आले. मालेगाव पोलीस ठाण्याचे जमादार सुनील काळदाते यांनी २७ नोव्हेंबर रोजी घटनास्थळाचा पंचनामा करून शे. इनूस यांचे प्रेत उत्तरिय तपासणीसाठी रवाना केले. त्यांच्या पश्चात पत्नी नेहरुनासाबी, मुलगी रुबीनाबी (वय १८), दुसरी मुलगी फातेमाबी (वय १६), आपूली (वय १२); तर एकुलता एक मुलगा रिजवान (वय ६ वर्षे) असा परिवार आहे. दरम्यान, गतवर्षी रुबीनाबी हिच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज अद्याप फिटले नसताना दुसरी मुलगीही लग्नाला आली. अशातच दैनंदिन रोजगाराची चणचण, या विवंचनेत शे. इनूस हे गेल्या काही दिवसांपासून त्रस्त होते, अशी प्रतिक्रिया त्यांचा भाऊ शे. अयुब यांनी दिली.
राजुरा येथे गरिबीला कंटाळून शेतमजूराची आत्महत्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 5:22 PM
राजुरा येथील शे. इनूस शे. तुराब (वय ४५) या शेतमजुराने गरिब परिस्थितीला कंटाळून अंगावर रॉकेल घेऊन स्वत:ला पेटवून घेतले. यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना २६ नोव्हेंबरच्या रात्री १०.३० वाजता घडली.
ठळक मुद्देमृत शेतमजुराचे नाव - शे. इनूस शे. तुराबअंगावर रॉकेल घेवून संपविली जीवनयात्रापहिल्या मुलीच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज आणि लग्नाच्या उंबरठ्यावर उभी असलेली दुसरी मुलगी या विवंचनेत ते होते