शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी पोलिस स्टेशनवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 2:59 PM

शिरपूरजैन (वाशिम) : येथे ६ फेब्रूवारी रोजी घडलेल्या हाणामारी प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी घटनेत जखमी झालेल्या गाभणे भावंडांसह इतर नागरिकांनी शनिवारी स्थानिक पोलिस स्टेशनवर मोर्चा काढला.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूरजैन (वाशिम) : येथे ६ फेब्रूवारी रोजी घडलेल्या हाणामारी प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी घटनेत जखमी झालेल्या गाभणे भावंडांसह इतर नागरिकांनी शनिवारी स्थानिक पोलिस स्टेशनवर मोर्चा काढला. दरम्यान, याच प्रकरणात आरोपींचे हात बांधून गावात फिरविल्याप्रकरणी शुक्रवारपासून काही महिलांनी सुरू केलेले साखळी उपोषण आजही सुरूच असल्याचे दिसून आले.शिरपूर येथील एका ‘फिल्टर वॉटर प्लांट’नजिक सांडपाण्यावरून अंभोरे व गाभणे या दोन गटात शाब्दिक वाद झाला. यादरम्यान अंभोरे गटाने गजानन गाभणे, विलास गाभणे आणि संतोष गाभणे असे तीनजण जखमी झाले होते. दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी प्रकाश अंभोरे, महादेव अंभोरे, विशाल अंभोरे यांच्यासह अन्य पाच ते सात लोकांवर कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल केला. आरोपींपैकी पोलिसांनी महादेव अंभोरे व विशाल अंभोरेसह अन्य एका आरोपीस २० फेब्रूवारीला ताब्यात घेतले. या घटनेतील मुख्य आरोपी मात्र अजूनही फरार असून त्यांना तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी घटनेत जखमी गाभणे भावंडांसह नागरिकांनी मोर्चा काढला. दुसरीकडे याच घटनेतील तीन आरोपींना हात बांधून गावात फिरविल्याप्रकरणी पोलिसांच्या भूमिकेचा निषेध म्हणून काही महिलांनी अंगिकारलेले साखळी उपोषण शनिवारीही सुरूच असल्याचे दिसून आले. दोन्ही गटातील लोकांनी कुठलेही अनुचित पाऊल न उचलता शांतता बाळगावी. पोलिसांचा तपास योग्यदिशेने सुरू असून मुख्य आरोपींनाही लवकरच अटक करण्यात येईल.- सुरेश नाईकनवरेपोलिस निरीक्षक, शिरपूर पोलिस स्टेशन

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन