लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - भारतीय संविधान सन्मान दिनानिमित्त वाशिम जिल्ह्यात भारिप-बहुजन महासंघ व आंबेडकरी अनुयायांतर्फे रॅली काढण्यात आली.संविधान दिनानिमित्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिला उजाळा देण्यासाठी वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा, मानोरा यासह ग्रामीण भागात विविध कार्यक्रम घेण्यात आले तसेच वाशिम, मंगरूळपीर शहरातून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सतत २ वर्ष ११ महिने १८ दिवस अहोरात्र परिश्रम घेऊन संविधानाची निर्मिती केली. सदर संविधान २६ जानेवारी १९५० पासून अंमलात आले. भारत सरकारने बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त २६ नोव्हेंबर २०१५ पासून संविधान सन्मान दिवस साजरा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. वाशिम जिल्ह्यात या दिनानिमित्त मोटारसायकल रॅली काढण्यात आली.
संविधान सन्मान दिनानिमित्त वाशिममध्ये निघाली रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 10:50 PM
भारतीय संविधान सन्मान दिनानिमित्त वाशिम जिल्ह्यात भारिप-बहुजन महासंघ व आंबेडकरी अनुयायांतर्फे रॅली काढण्यात आली.
ठळक मुद्देडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिला दिला उजाळा वाशिम, मंगरूळपीर शहरात काढण्यात आली भव्य मोटारसायकल रॅली