सदर महोत्सवामध्ये मालेगाव तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर माहिला बचत गट तसेच शहरी भागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून या रानभाजी महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात येत आहे. तसेच ग्रामीण भागातील शेतशिवारामध्ये उपलब्ध असलेल्या रानभाजी आणि रानफळे यांचे स्टॉल प्रदर्शनामध्ये लावण्यात येणार आहेत. तरी इच्छुक रानभाजी विक्रेत्यांनी अधिक माहितीकरिता आपल्या गावाचे कृषी सहायक यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन मालेगाव तालुका कृषी अधिकारी शशीकिरण जांभरूणकर यांनी केले आहे.
-----------------
नैसर्गिकरित्या उगविणाऱ्या भाज्यांचे सेवन आवश्यक
ग्रामीण भागातील शेत शिवारात अनेक प्रकारच्या रानभाज्या, रानफळे नैसर्गिकरित्या उगवितात. हा रानमेवा मानवी शरीरास पोषक आणि आवश्यक आहे. या रानभाज्यांच्या सेवनामुळे आरोग्य सुदृढ राहते. रोगप्रतिकारशक्तीही बळावते. त्यामुळे प्रत्येकाने रानभाज्यांचे सेवन करणे आवश्यक असून, रानभाजी व रानफळे यांचे आहारातील महत्त्व व लाभकारक गुणधर्म शहरी भागातील नागरिकांना समजविण्याच्या उद्देशानेच कृषी विभागाकडून रानभाजी महोत्सवाचे आयोजन केले जात आहे.