लोकमत न्यूज नेटवर्कमंगरूळपीर : २२ वर्षीय युवतीस लग्नाचे आमीष दाखवून तीच्यासोबत अतीप्रसंग करणाऱ्या आरोपीवर पोलिसांनी १८ नोव्हेंबरला गुन्हा दाखल केला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील तºहाळा येथील २२ वर्षीय युवतीने दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे, की १७ नोव्हेंबरपुर्वी आरोपी माधव देवराव ढाले (वय ३४, रा. सांडवा, ता. पुसद) याने लग्नाचे आमीष दाखवून अतीप्रसंगी केला. तसेच श्रीमंत असल्याचे खोटे दस्तावेज तयार करून फसवणूक केली. अशा तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीवर भादंविचे कलम ३७६, ४४९, ४६८, ४७१, ४२०, ३४ अन्वये गुन्हे दाखल केले. आरोपीने गाडी, बंगला असल्याचे भासविलेया प्रकरणाची सुरूवात शालेय सहलीदरम्यान झाली. पिडित मुलगी सहलीला गेली असता, भाड्याने आणलेल्या वाहनावर आरोपी हा चालक म्हणून आला होता. यादरम्यान त्याची पिडित युवतीशी ओळख झाली आणि त्याने युवतीस प्रेमाच्या जाळ्यात ओढले. माझ्याकडे दोन ते तीन चारचाकी वाहने असून पुसद येथे मोठा बंगला आणि कुटूंबात मोठ्या प्रमाणात शेती आहे. तसेच अविवाहित असून वडिलांशी पटत नसल्याने मी घरी जात नसल्याची बतावणी आरोपीने केली. प्रत्यक्षात मात्र आरोपीकडे त्याने सांगितल्याप्रमाणे काहीच नसून तो विवाहित असण्यासोबतच त्याला मुले देखील असल्याची बाब पिडित युवतीच्या लक्षात येताच तीने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. त्यावरून आरोपीवर गुन्हे दाखल झाले.
लग्नाचे आमिष दाखवून युवतीसोबत अतीप्रसंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 1:48 PM