रिसोड : नादुरूस्त व बंद पडलेले विद्युत रोहित्र लवकर बदलून मिळत नसल्याने वंचित बहुजन आघाडीतर्फे तालुक्यातील वाकद येथे ९ डिसेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.रब्बीचा हंगाम सुरु असल्यामुळे शेतकºयांना सिंचनासाठी विजेची आवश्यकता आहे.अनेक भागात विज रोहित्र बंद असल्यामुळे पिकांना पाणी देण्यातअडचणी येत आहेत. आधीच संततधार पावसामुळे उडीद, मूूग व सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले. आता रब्बी हंगामात गहु, हरभरा पेरणी झालेली आहे. पाणी मुबलक असताना विज रोहित्र बंद असल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी करूनही दुर्लक्ष होत असल्यामुळे ९ डिसेंबर रोजी वाकद येथे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाºयांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी महावितरणच्या अभियंत्यांनी मागण्या निकाली काढण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सय्यद अकील,जिल्हाध्यक्ष रवींद्र देशमुख,जिल्हा सल्लागार रवींद्र मोरे पाटील, मंदा धांडे, विश्वनाथ पारडे, गिरीधर शेजुळ, रंगनाथ धांडे,अर्जुन डोंगरदिवे,अनिल गरकळ,प्रदीप खंदारे यांच्यासह पदाधिकाºयांची उपस्थिती होती.
विद्युत रोहित्र न मिळाल्याने 'रास्ता-रोको '
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2020 4:59 PM