लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शासनाच्या निर्देशानुसार यंदापासून बायोमेट्रिक पद्धतीने रेशन वितरण प्रणालीस सुरुवात करण्यात आली. यासाठी जिल्ह्यातील ७७४ स्वस्तधान्य दुकानांत बायोमेट्रिक अर्थात पॉस मशीनचे वितरण मार्च महिन्यातच करण्यात आले; परंतु अद्यापही ६० टक्के दुकानांत त्याचा वापर होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे पारदर्शक रेशन वितरण प्रणालीस खो मिळाला आहे. शासनाच्या निर्देशानुसार वाशिम जिल्ह्यातील सर्वच स्वस्त धान्य दुकानदारांना बायोमेट्रिक रेशन प्रणालींतर्गत पॉस मशीनचे वाटप करुन मशीन संदर्भात प्रशिक्षण देऊन संबंधित तहसील कार्यालयाच्यावतीने जिल्ह्यातील सहाही तालुक्यांत एकूण ७७४ पॉस मशिनचे वाटप करण्यात आले आहे. काही दुकानदारांना या मशिनच्या वापराचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. या प्रणाली नुसार स्वस्तधान्य कार्डधारकांना धान्याचे वाटप होणे अपेक्षीत होते. मशीनमध्ये अंगठ्याचा ठसा लावल्यानंतर ज्या कुटूंबातील शिधापत्रिका धारकाचे आधारकार्ड आॅनलाईन नोंदणी असेल तेवढयाच लोकांचे धान्य मिळते. यासाठी कुटुंबातील सदस्य धान्य घेताना आवश्यक आहे. स्वस्त धान्य विभागातील काळाबाजार रोखण्यासाठी शासनाने हे पाऊल उचलले आहे. या मशीनला अंगठ्याचा ठसा दिल्यानंतरच या कार्डधारकाला धान्य मिळते; परंतु या प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी ७७४ दुकानदारांना पॉस मशीनचे वाटप करूनही ६० टक्के दुकांनात त्याचा वापर होत नसल्याचे वास्तव आहे.
वाशिम जिल्ह्यात बायोमेट्रिक वितरण प्रणालीस रेशन दुकानदारांचा ‘खो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2017 7:47 PM
वाशिम: शासनाच्या निर्देशानुसार यंदापासून बायोमेट्रिक पद्धतीने रेशन वितरण प्रणालीस सुरुवात करण्यात आली. यासाठी जिल्ह्यातील ७७४ स्वस्तधान्य दुकानांत बायोमेट्रिक अर्थात पॉस मशीनचे वितरण मार्च महिन्यातच करण्यात आले; परंतु अद्यापही ६० टक्के दुकानांत त्याचा वापर होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे पारदर्शक रेशन वितरण प्रणालीस खो मिळाला आहे.
ठळक मुद्देवाशिम जिल्ह्यातील वास्तव६० टक्के दुकानांत मशीनचा वापरच नाही