संतोष वानखडे वाशिम, दि. १४: जिल्ह्यातील बहुतांश स्वस्त धान्य दुकानांतून दरपत्रक व माहितीदर्शक फलक गायब झाल्याचे स्टिंग लोकमतने प्रकाशित करताच पुरवठा विभागात एकच खळबळ उडाली. स्वस्त धान्य दुकानांची तपासणी करण्याचे निर्देश जिल्हा पुरवठा अधिकार्यांनी दिले. फलक नसणार्या दुकानांचा अहवाल मागविला असून, दोषी आढळणार्यांवर कडक कारवाईचे संकेत पुरवठा विभागाने दिले.सार्वजनिक वितरण प्रणालीत पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने काही नियम घालून दिले आहेत. गोरगरिबांना वितरित होणार्या रेशन धान्याचा पुरवठा पात्र लाभार्थींपर्यंत योग्य किमतीत व योग्य प्रमाणात व्हावा म्हणून रेशन दुकानात भावफलक, उपलब्ध साठा, तक्रार वही ठेवणे बंधनकारक आहे. शासनाच्या या नियमांचा ह्यअर्थह्ण संबंधितांनी स्वत:ला ह्यअर्थह्ण आणण्याच्या कामी लावल्याने या योजनेतील पारदर्शकता हरवत चालली आहे.रेशन दुकानात लोकांना स्पष्टपणे वाचता येईल, असा महिती फलक असला पाहिजे. या फलकावर दुकानाची वेळ, सुटीचा दिवस, दुकान क्रमांक, तक्रार वही उपलब्ध असल्याची नोंद, रेशन कार्यालयाचा पत्ता व फोन, रेशनकार्ड संख्या, भाव व देय प्रमाण, उपलब्ध कोटा, रेशनवर घेतलेल्या धान्याची पावती देणे अनिवार्य असतानाही, वाशिम जिल्ह्यात काही दुकानांमध्ये या नियमाला मूठमाती दिली जात असल्याचे प्रकार सुरू आहे. यासंदर्भात ह्यलोकमतह्ण चमूने ११ ऑगस्ट रोजी ग्रामीण भागातील स्वस्त धान्य दुकानात स्टिंग ऑपरेशन राबविले. मालेगाव तालुक्यातील राजुरा परिसरातील काही दुकाने बंद आढळून आली, तर काही दुकानांमध्ये कोणत्याही प्रकारचे दरपत्रक आढळून आले नाही. एक दुकान तर पडक्या घरात थाटले असल्याचे दिसून आले. शिरपूर परिसरातील काही गावांमध्ये असेच चित्र दिसून आले.
रेशन दुकानांची चौकशी होणार!
By admin | Published: August 15, 2016 2:27 AM