मालेगाव : तालुक्यातील हनवतखेडा येथील प्रगतिशील शेतकरी तथा खरेदी-विक्रीचे संचालक हरिदास किसनराव राऊत व त्यांच्या पत्नी कमलाबाई राऊत हे मागील अनेक वर्षांपासून हनवतखेडा या गावाला मोफत पाणीपुरवठा करीत आहेत. ग्रामस्थांची तहान भागवून समाजसेवा करण्याचा वसाच त्यांनी घेतला आहे.हनवतखेड्यात ४५ टक्के आदिवासी, ४५ टक्के बौद्ध व १० टक्के मराठा, असे धार्मिक लोकसंख्येचे प्रमाण आहे. या गावातील ग्रामपंचायतची विहिर दरवर्षी उन्हाळ्यात कोरडी पडते. त्यामुळे ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. अशात हरीदास राऊत यांनी त्यांच्या शेतात असलेल्या १०० चौरस मीटर शेततळ्याचे पाणी मोटारपंपाच्या आधारे ग्रामपंचायतच्या पाईपलाईने गावात आणले आणि ग्रामस्थांची तहान भागविणे सुरू केले. त्यांच्याकडून संपूर्ण गावाला दररोज पाणीपुरवठा करण्यात येतो. विशेष म्हणजे ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीकडून किंवा सरकारकडून कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता ते व त्यांच्या पत्नी गावाला पाणीपुरवठा करत आहेत, तसेच आपल्या स्वत:च्या घरील कूपनलिकेतूनही रोज सकाळी सात ते दहा या वेळेत त्यांची पत्नी कमलाबाई राऊत ह्या स्वत: उभे राहून सर्व महिलांना समप्रमाणात मोफत पाणीपुरवठा करतात हे कार्य त्यांचे मागील ५ वर्षांपासून अविरत चालू असून शेवटपर्यंत करणार असल्याचे त्यांनी मनोदय व्यक्त केला. त्यामध्ये ते शेवटपर्यंत कुठलीही सरकारची आर्थिक मदत न घेता स्वखर्चातून गावकऱ्यांना पाणीपुरवठा वर्षानूवर्षे करणार असल्याचा मनोदय व्यक्त केला व तसेच काळामाथा येथील अवलिया महाराज संस्थान येथे सुद्धा त्यांच्या शेतातून पाणी पुरवठा होत असून, तिथे होत असलेले लग्न समारंभ व इतर कार्यक्रमांना सुद्धा त्यांच्याच शेतातून मोफत पाणीपुरवठा करण्यात येतो.
राऊत परिवाराचा वसा; हनवतखेडावासियांना स्वखर्चाने पाणी पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 1:50 PM
मालेगाव :- तालुक्यातील हनवतखेडा येथील प्रगतिशील शेतकरी तथा खरेदी-विक्रीचे संचालक हरिदास किसनराव राऊत व त्यांच्या पत्नी कमलाबाई राऊत हे मागील अनेक वर्षांपासून हनवतखेडा या गावाला मोफत पाणीपुरवठा करीत आहेत.
ठळक मुद्देहरीदास राऊत यांनी त्यांच्या शेतात असलेल्या १०० चौरस मीटर शेततळ्याचे पाणी मोटारपंपाच्या आधारे ग्रामपंचायतच्या पाईपलाईने गावात आणले. ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीकडून किंवा सरकारकडून कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता ते व त्यांच्या पत्नी गावाला पाणीपुरवठा करत आहेत.लग्न समारंभ व इतर कार्यक्रमांना सुद्धा त्यांच्याच शेतातून मोफत पाणीपुरवठा करण्यात येतो.