लोकमत न्यूज नेटवर्क
शेलूबाजार ( वाशिम ) : नजीकच्या तर्हाळा येथील संत भायजी महाराज यांच्या भरत भेट यात्रेनिमित्त २३ डिसेंबर रोजी पहाटे ५.३० वाजताचे दरम्यान विधिवत पूजा करुन रावण, कुंभकर्णाचे दहन शेकडो नागरिकांच्या उपस्थित पार पडले . हा सोहळा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पंचक्रोशीतील भक्तगण पहाटे ४ वाजेपासून तर्हाळा येथे दाखल झाले होते. तर्हाळा येथील संत भायजी महाराज संस्थानच्यावतीने भरत भेट यात्रा महोत्सवनिमित्त मागील कित्येक वर्षापासूनची परंपरा जपत हा उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव साजरा करण्यासाठी गावकरी जोमाने सप्ताहाभर अहोरात्र मेहनत घेतली . सप्ताहाभर विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रावण कुंभकर्णाचे पुतळे तयार करण्यासाठी वृध्द मंडळी मागील ८ ते १५ दिवसापासून कामाला लागले होते . त्यांना लहान लहान बालकांनी हातभार लावला दि २२ डिसेंबर रोजी दत्त जयंती निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला . २३ डिसेंबर रोजी मध्यरात्री पासून रावण, कुंभकर्ण दहन कार्यक्रमाची तयारी सुरु करण्यात आली. पहाटे ५ वाजेपासून विधीवत पूजेचा कार्यक्रम सुरु करण्यात आले . या सोहळ्यात कडाक्याची थंडी असतांनाही महिलांची लक्षणीय उपस्थीती होती. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांच्या वेशभूषातील बालकांनी लोकांची मने जिंकली .सकाळी ५ . ४० वाजता राम, लक्ष्मण यांनी रावण व कुंभकर्णाचे वध केल्यावर हनुमानाचे हस्ते दहन करण्यात आले . त्यानंतर राम लक्ष्मण यांची भरत व शत्रुघ्न यांची भेट झाली . या भेटी नंतर आरतीचा कार्यक्रम पार पडला .