शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

निर्बंधाला पुन्हा मुदतवाढ; सायंकाळी ४ पर्यंतच खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 12:07 PM

Washim News : सायंकाळी ४ वाजेपर्यंतच दुकाने सुरू राहणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : डेल्टा प्लस व्हेरियंटचा संभाव्य धोका लक्षात घेता जिल्ह्याचा समावेश अनलॉकच्या तिसऱ्या स्तरात झाल्याने २८ जून ते १२ जुलै या दरम्यान निर्बंध लागू करण्यात आले. या निर्बंधांना पुढील आदेशापर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याने यापुढेही सायंकाळी ४ वाजेपर्यंतच दुकाने सुरू राहणार आहेत. शनिवार व रविवारी केवळ अत्यावशक वस्तू व सेवांची दुकाने सुरु राहतील तर इतर सर्व दुकाने पूर्णत: बंद राहतील.कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून तिसºया स्तरातील निर्बंध जिल्ह्यात लागू आहेत. १२ जुलैपासून पुढील आदेशापर्यंत निर्बंधाला मुदतवाढ देण्यात आली असून, यापूर्वीच्या नियमावलीत कोणताही बदल नाही. या आदेशानुसार अत्यावश्यक वस्तू व सेवांसह इतर सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार दरम्यान सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा राहील. मात्र, शनिवारी व रविवारी केवळ अत्यावशक वस्तू व सेवांची दुकाने सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील व इतर सर्व दुकाने पूर्णत: बंद राहतील. शनिवारी व रविवारी केवळ पार्सल व होम डिलिव्हरी सुविधा सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर दररोज सायंकाळी ४ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील. याठिकाणी ए. सी.चा वापर करण्यास मनाई राहील. सार्वजनिक ठिकाणे, क्रीडांगणे, मोकळ्या जागा, उद्याने, बगीचे, मॉर्निंग वॉक व सायकलिंगला सकाळी ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत मुभा राहणार आहे. बाहेर मोकळ्या जागेत सकाळी ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत व सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत क्रीडा विषयक बाबींना मुभा राहील. या सर्व प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी इन्सिडेंट कमांडर तथा तहसीलदार यांची राहणार आहे.

५० टक्के कर्मचारी उपस्थितीखाजगी बँक, विमा, औषधी कंपनी, सूक्ष्म वित्त संस्था व गैर बँकिग वित्तीय संस्था यांची कार्यालये नियमितपणे सुरु राहू शकतील. कोरोना विषयक कामे करणाऱ्या आस्थापना, कृषि, बँक, मान्सूनपूर्व कामांशी संबंधित यंत्रणा व आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित यंत्रणा, कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरु राहतील.  दुय्यम निबंधक कार्यालय, एलआयसी, एमएसआरटीसी आदी शासकीय कार्यालये १०० टक्के क्षमतेने सुरु राहतील. उर्वरित सर्व शासकीय कार्यालये ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरु राहतील.

जिल्ह्यात तिसऱ्या स्तरातील निर्बंधांना पुढील आदेशापर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. निर्बंधाचे पालन करून जिल्हावासियांनी प्रशासनाला सहकार्य करावे.- शैलेश हिंगेनिवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक