शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

Maharashtra election 2019 : वाशिम जिल्ह्यात यंदा बंडखोरांमुळे चुरस वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 6:06 AM

तीनही विद्यमान आमदार रिंगणात

वाशिमच्या तीन विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढतीचे चित्र असून वाशीममध्ये शिवसेना तर रिसोडमध्ये काँग्रेसच्या बंडाळीने चुरस निर्माण झाली आहे. युतीमध्ये भाजपकडे वाशिम व कारंजा या जागा आल्या असून शिवसेनेला रिसोड मतदारसंघ देण्यात आला आहे.आघाडीमध्ये रिसोड व वाशिम काँग्रेसला तर कारंजा विधानसभा मतदारसंघ राष्टÑवादी काँग्रेसकडे आहे. रिसोड मध्ये काँग्रेसचे उमेदवार अमित झनक, काँग्रेसचे बंडखोर अनंतराव देशमुख व शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ सानप यांच्यामध्ये लढत रंगली आहे. देशमुख-झनक यांच्यामधील सत्तासंघर्ष सर्वश्रृत असल्याने आता देशमुखांसाठी अस्तित्वाची तर झनकांसाठी प्रतिष्ठेची लढाई झाली आहे. वाशिममध्ये भाजपाचे उमेदवार लखन मलिक यांच्यासमोर शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार शशीकांत पेंढारकर, वंचित बहुजन आघाडीचे डॉ. सिध्दार्थ देवळे यांचे आव्हान आहे. या मतदारसंघात शिवसेनेतील मोठा गट हा बंडखोराचे थेट समर्थन करत असल्याने येथे युतीधर्म अडचणीत आला आहे.दूसरीकडे मानापमान नाटयामुळे काँग्रेसचे उमेदवार रजनी राठोड यांच्यासमोर अडचणी उभ्या करण्याचा प्रयत्न होत आहे. कारंजा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे उमेदवार राजेंद्र पाटणी यांनी विकासकामांचा लेखाजोखा घेऊनच प्रचाराला सुरूवात केली असून या मतदारसंघात पाटणी तसेच राष्टÑवादी काँग्रेसचे प्रकाश डहाके, बसपाचे युसूफ पुंजानी यांच्यामध्ये लढत होणार असल्याचे चित्र आहे.वंचित बहुजन आघाडीच्यावतीने रिसोडमध्ये दिलीपराव जाधव, वाशिममध्ये डॉ. सिध्दार्थ देवळे व कारंजात डॉ. राम चव्हाण यांच्या उमेदवारीमुळे तीनही मतदारसंघामध्ये मतांचे विभाजन निकालावर परिणाम करणारे ठरणार आहे. दरम्यान अमित शाह यांनी मानोरा येथील सभेपूर्वी पोहरादेवीला गेल्यानंतरही रामराव महाराजांची भेट न घेतल्याने बंजारा समाजात पसरलेली नाराजी दुर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, १४ आॅक्टोबर रोजी पोहरादेवी येथे धाव घेत संत रामराव महाराजांची भेट घेत नाराजी दूर करण्याचा केलेला प्रयत्न जमेची बाजू ठरला आहे.प्रचारातील चर्चेचे मुद्देविधानसभा निवडणुकीत प्रचारात आपण काय करणार हे सांगण्याऐवजी परस्परविरोधी टिकेवरच अधिक भर दिला जात आहे. प्रमुख पक्षाने आपले जाहीरनामे घोषित केलेमात्र ते प्रचारात दिसून येत नसल्याने मतदारांमध्ये चर्चा रंगतांना दिसून येत आहेत.विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शेतकरी हाच प्रत्येक पक्षाचा केंद्रबिंदू ठरत आहे. तथापि, शेतकऱ्यांच्या विकासासाठी नेमके काय करणार हे सांगण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या समस्यांचा पाढाच वाचण्यावर अधिक भर दिला जात आहे. त्यात कर्जमाफी, पिकविमा, पिक नुकसान, शेतमालाचे हमी दर आदी मुद्दे प्रामुख्याने मांडले जात आहेत.व्हॉटसअ‍ॅपवरील संदेश, फेसबुकवरील पोष्टमधूनही परस्परविरोधी टिकेचा भडीमार व त्यावर येत असलेल्या प्रतिक्रीयांवर चांगलेच वादळ उठत आहे.