लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ग्रामीण भागातील रमाई आवास योजनेंतर्गत सन २०१६-१७ मधील जिल्ह्यातील घरकुल लाभार्थींचे प्रलंबित अनुदान आठ दिवसांपूर्वी शासनाने अदा केले; परंतू सन २०१७ ते २०२० या तीन वर्षातील प्रलंबित अनुदानाची प्रतीक्षा कायम आहे. दुसरीकडे निधीच नसल्याने २०२०-२१ मध्ये एकाही घरकुलाचे बांधकामही सुरू होऊ शकले नाही.राहायला निवारा नसलेले, दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी, मागासवर्गीय प्रवर्गातील लाभार्थींना रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल बांधकामासाठी १ लाख २० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. सन २०१६-१७ ते २०१९-२० या वर्षात जिल्ह्यात हजारो घरकुले मंजूर होऊन लाभार्थींनी बांधकामदेखील केले. सन २०१६-१७ या वर्षात ११६४ पैकी १०४८ घरकुल लाभार्थींना अनुदान मिळाले तर ११६ लाभार्थींना अनुदान मिळाले नव्हते. याप्रमाणेच सन २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० मध्ये घरकुल बांधकाम करणाऱ्या जवळपास तीन हजारावर लाभार्थींना अनुदान मिळाले नाही. राज्य शासनाने आठ दिवसांपूर्वी सन २०१६-१७ मधील प्रलंबित अनुदान देण्यासाठी जवळपास एक कोटींचा निधी मंजूर केला. परंतू, सन २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या तीन वर्षातील प्रलंबित अनुदानासंदर्भात अद्याप निधीची तरतूद नसल्याने घरकुल लाभार्थींमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.दुसºया व तिसºया टप्प्यातील अनुदान न मिळाल्याने एक हजारावर लाभार्थींच्या घरकुलांचे बांधकाम अर्धवट राहिले आहे.रमाई आवास योजनेंतर्गत सन २०१६-१७ या वर्षातील घरकुलांचे प्रलंबित अनुदान शासनस्तरावरूनच लाभार्थींच्या बँक खात्यात जमा होणार आहे. उर्वरीत तीन वर्षातील अनुदान मंजूर झाल्यानंतर संबंधित लाभार्थींच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.-डॉ. व्ही.एन. वानखेडेप्रभारी संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद वाशिम
केवळ एक वर्षाचा निधी मिळाला; तीन वर्षातील अनुदानाचे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 12:40 PM