सुनील काकडेवाशिम, दि. १२- बंद झालेल्या ५00 आणि १000 रुपयांच्या नोटा स्विकारून नगर पालिकेचा कर, विद्यूत देयक, सिंचन पाणीपट्टी यासह महसूल विभागांतर्गत आकारला जाणारा कर भरण्यास शासनाकडून मूभा देण्यात आली आहे. यामाध्यमा तून गत २ दिवसांत करवसूलीने विक्रम गाठला असून संबंधित विभागांवरील बोझा बहुतांशी घटला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला रात्री ८ वाजेनंतर अचानकपणे भारतीय चलनातून ५00 आणि १000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. यामुळे ९ नोव्हेंबरच्या सकाळपासूनच नागरिकांची बंद झालेल्या नोटा बँकेत ह्यडि पॉझिटह्ण करण्यासाठी ह्यधांदलघाईह्ण सुरू झाली, ती सलग चौथ्या दिवशी अर्थात शनिवार, १२ नोव्हेंबरलाही कायम असल्याचे पाहावयास मिळाले. दरम्यान, चलना तून आणि व्यवहारातून रद्द ठरविण्यात आलेल्या ५00 आणि १000 रुपयांच्या नोटा देवून नागरिक त्यांच्याकडे असलेली नगर पालिका कराची थकबाकी, जलसंपदा विभागाकडून आकारली जाणारी सिंचन पाणीपट्टी, महावितरणची विद्यूत देयके, पंचायत विभागाशी संबंधित गौणखनिज, घरपट्टी, नळ पट्टी, वीज पट्टी आदिंचा भरणा करण्याची मूभा देण्यात आली आहे. १४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत नागरिकांकडून जुन्या ५00 व १000 रुपयांच्या नोटा स्विकारून त्या-त्या विभागांनी कर भरणा करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे शासनाचे निर्देश आहेत. तथापि, जिल्ह्यातील वाशिम, रिसोड, कारंजा, मंगरूळपीर या चार नगर परिषदा आणि मानोरा, मालेगाव या दोन नगर पंचायतीअंतर्गत ११ नोव्हेंबरला एकाच दिवशी एक कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची करवसूली झाली. त्यात वाशिम नगर परिषदेचा आकडा सर्वाधिक ५३ लाख रुपये आहे. त्यापाठोपाठ रिसोड नगर परिषदेने आतापर्यंत २२ लाख रुपये करवसूली केली असून कारंजा नगर परिषदेने १६ लाख रुपये कर वसूल केला. मंगरूळपीर नगर पालिका यातुलनेत माघारली असून दोन दिवसांत या पालिकेने ४ लाख रुपयांच्या आसपास कर वसूली केली आहे. मालेगाव नगर पंचायतमध्ये नागरिकांनी दोन दिवसांत १0 लाख रुपये कराचा भरणा केला असून मानोरा नगर पंचायतने १ लाख रुपये करवसूली केल्याची माहिती आहे. यासह महावितरणच्या आवाहनालाही प्रतिसाद दे त थकबाकीदार ग्राहकांनी दोन दिवसांत तब्बल ९१ लाख ३८ हजार रुपयांची देयके अदा केली आहेत.थकीत देयके, कराची रक्कम भरणा करण्यास १४ नोव्हेंबरपर्यंंत मुदतजुन्या तथा रद्द ठरविण्यात आलेल्या ५00 आणि १000 रुपयांच्या नोटांमधून नगर परिषदेचा कर, सिंचन पाणीपट्टी, महावितरणचे वीज देयक, पंचायत विभागाशी संबंधित सर्व प्रकारचा कर अदा केला जावू शकतो. यासाठी १४ नोव्हेंबरच्या रात्री १२ वाजेपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. नागरिकांनी या उपलब्धीचा लाभ घेवून आपल्याकडील थकबाकी अदा करावी, असे आवाहन त्या-त्या विभागांकडून करण्यात आले आहे. सिंचन पाणीपट्टीसह जलसंपदा विभागाशी संबंधित इतर सर्व कर भरणा करण्यासाठी ५00 व १000 रुपयांच्या नोटा स्विकारल्या जात आहेत. रविवार, १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपयर्ंत व सोमवार, १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते रात्री १२ वाजेपयर्ंत शाखा कार्यालये व वसुली केंद्रे सुरु राहणार आहेत. महावितरणच्या वतीने विजबिल अदा करण्यासाठी जुन्या ५00 व १000 रुपयांच्या नोटा स्विकारल्या जात आहेत. त्यास १४ नोव्हेंबरच्या रात्री १२ वाजेपर्यंंत मुदतवाढ देण्यात आली आहे. १४ नोव्हेंबरला सार्वजनिक सुटी असली तरी महावितरणने विजबिल भरणा केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. १३ नोव्हेंबरला सकाळी १0 ते सायंकाळी ७ वाजेपर्यंंत तसेच १४ नोव्हेंबरला सकाळी १0 ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंंत ग्राहकांना सेवा दिली जाणार आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता विजय मेश्राम यांनी केले.
जुन्या नोटांवर करवसूलीचा विक्रम!
By admin | Published: November 13, 2016 2:30 AM