वाशिम : मतदार नावनोंदणी कार्यक्रम आणि मतदार यादी पुनरिक्षण विशेष मोहीम महसूल विभागाच्यावतीने जिल्हाभरात राबविण्यात आली; मात्र, शासनाच्या उद्देशाला कर्मचार्यांनीच हरताळ फासला असून, काही केंद्रांवर अधिकारी व कर्मचारी रविवारी दुपारी १२ वाजतानंतर फिरकलेही नसल्याचे वास्तव ह्यलोकम तह्णने केलेल्या स्टिंग ऑपरेशनदरम्यान निदर्शनास आले आहे. ग्रामीण भागातील अनेक मतदान केंद्रे तर सकाळपासूनच कुलूपबंद असल्याचे आढळून आली. २0१६ या वर्षात होणार्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये, पुनरिक्षणानंतर तयार होणारी मतदार यादी वापरण्यात येणार आहे. मतदार यादीत नाव समाविष्ट नसणारे नागरिक तसेच १ जानेवारी २0१६ रोजी वयाची १८ वर्ष पूर्ण करणार्यांना ७ नोव्हेंबरपर्यंत आपली नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट करता येणार आहेत. सदर कार्यक्रम ८ ऑक्टोबरपासून सुरू झाला असून, या कार्यक्रमाला व्यापक प्रमाणात प्रसिद्धी आणि जनजागृतीचा भाग म्हणून १८ ऑ क्टोबर रोजी राज्यभर विशेष मोहीम राबविण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार वाशिम जिल्ह्यात ९६५ मतदान केंद्रांवर ९६५ मतदान केंद्र अधिकारी व त्यांना सहायक म्हणून अन्य कर्मचार्यांच्या नियुक्त्या जिल्हा निवडणूक विभागाने केलेल्या आहेत. मतदान केंद्र अधिकार्यांवर 'वॉच' ठेवण्यासाठी ५0 पर्यवेक्षकांची नियुक्ती केलेली आहे. रविवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत प्रत्येक म तदान केंद्रांवर मतदान केंद्र अधिकार्यांचा ताफा उपस्थित राहणे बंधनकारक होते. मतदान केंद्रांवर नेमका काय प्रकार सुरू आहे, याचा आढावा म्हणून 'लोकमत'ने जिल्हाभर स्टिंग ऑपरेशन केले. यामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.
पुनरिक्षण मोहिमेला कर्मचा-यांनीच फासला हरताळ
By admin | Published: October 19, 2015 1:34 AM