लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: यंदा महाबीजकडून घेतलेले बियाणे न उगविण्याच्या प्रकारासह उगविलेल्या बियाण्यांत भेसळ झाल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. यामध्ये मंगरुळपीर तालुक्यातील चांभई येथील शेतकरी गोविंदा भगत यांचा समावेश होता. या प्रकरणाचा पाठपुरावा लोकमतकडून करण्यात आल्यानंतर कृषी विभागाकडून या संदर्भातील अहवाल महाबीजकडे पाठविण्यात आला. त्याचे परिक्षण करून महाबीजकडे गोविंदास भगत यांना भेसळयुक्त बियाण्यांपोटी नुकसान भरपाई म्हणून प्रति एकर सात क्विंटल सोयाबीन देण्यास मान्यता दिली आहे.मंगरुळपीर तालुक्यातील शेतकरी गोविंदा भगत यांनी मंगरुळपीर खरेदी विक्री संघाकडून महाबीजचे सोयाबीन वाण विकत घेतले होते. तथापि, त्यांनी पेरणी केल्यानंतर उगवलेली झाडे ही त्यांनी मागितलेल्या वाणासह इतर वाणांची असल्याचे त्यांना दिसले. त्यावरून त्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली. लोकमतकडून या प्रकरणाचा वारंवार पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर या शेतकºयाच्या शेताची पंचायत समितीचे कृषी अधिकारी पंदेकृवीचे वाशिम येथील शास्त्रज्ञ, तसेच महाबीजच्या प्रतिनिधीकडून पाहणी करण्यात आली असता. त्यांना ७० टक्के भेसळ असल्याचे दिसले. याबाबतही टाळाटाळ होत असल्याने लोकमतकडून पुन्हा वृत्त प्रकाशित करू न महाबीजचे लक्ष वेधण्यात आले. अखेर भेसळयुक्त बियाण्यांच्या अहवालाचे परिक्षण करून महाबीजने या शेतºयाला झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार शेतकºयाला प्रति एकर सात क्विंटल सोयाबीन भरपाई म्हणून देण्यात येणार आहे.
भेसळयुक्त बियाण्यांचा शेतक-यांना मोबदला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 7:19 PM
यंदा महाबीजकडून घेतलेले बियाणे न उगविण्याच्या प्रकारासह उगविलेल्या बियाण्यांत भेसळ झाल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. यामध्ये मंगरुळपीर तालुक्यातील चांभई येथील शेतकरी गोविंदा भगत यांचा समावेश होता
ठळक मुद्देमहाबीजकडून मान्यताप्रति एकर ७ क्विंटलची नुकसान भरपाई