जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, डॉ. उमेश मडावी, डॉ. राजेश पवार यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने सर्व हेल्थ वर्कर्स, फ्रन्टलाईन वर्कर्स यांना पुन्हा एकदा या संकटावर मात करण्यासाठी सज्ज राहावे लागणार आहे. त्यामुळे सर्वांनी कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेऊन कोरोना संसर्गापासून आपला बचाव करणे आवश्यक आहे. कोरोना प्रतिबंधक लस पूर्णत: सुरक्षित आहे. जिल्ह्यात नोंदणी झालेल्या ५२ टक्केपेक्षा जास्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत कोरोनाची लस घेतली आहे. त्यापैकी कोणालाही लसीकरणाचा दुष्परिणाम जाणवलेला नाही. त्यामुळे कोरोना लसीकरणाबाबत संदेश प्राप्त होताच सर्वांनी नजीकच्या लसीकरण केंद्रावर जाऊन कोरोनाची लस घ्यावी. मनात कोणतीही भीती अथवा शंका बाळगू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.
नोंदणी झालेल्या कर्मचाºयांनी २० फेब्रुवारीपुर्वी लस घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 5:18 AM