शासनामार्फत शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी अनेक चांगल्या योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घेऊन शेतकरी आपल्या पिकाची खरेदी विक्री, साठवणूक, प्रक्रिया व मार्केटिंगसाठी विविध उपक्रम राबवीत आहेत. अशा कंपन्यांमार्फत शेतमालाची ऑनलाईन खरेदी-विक्रीही आता सुरु झाली असून, शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत आहे. ई-नामच्या माध्यमातूनही शेतकरी उत्पादक कंपनी ‘एक देश, एक बाजार’ सोबत जुळले जात असून, अधिकाधिक शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या निर्मितीसाठी स्वयंसेवी, सामाजिक संस्थांनाही मोहिमेत सहभागी करून घेण्यात आले आहे. त्यात वाशिम जिल्ह्यात कृषी विकास आणि ग्रामीण प्रशिक्षण संस्थेने सहभाग घेतला असून, वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना, नोंदणी आणि मार्गदर्शनासाठी संस्थेशी संपर्क करावा, असे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे.
शेतकरी उत्पादक कंपनीच्या नोंदणीची मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 4:55 AM