मंगरुळपीर : येथील जिल्हा परिषद हायस्कुल मध्ये बदली झालेल्या आठ शिक्षकांना तात्काळ बदली ठिकाणच्या शाळेवर रुजु होण्याचे ग्रामविकास मंञालयाचे आदेश असुनही या आदेशाला केराची टोपली दाखवत रुजु करुन घेण्यास नकार शाळेचे मुख्याध्यापक यांनी दिल्याने सबंधीत शिक्षकांना मोठी अडचण निर्माण झाली आहे.
शिक्षकांच्या शासकीय नियमानुसार बदल्या झाल्या आहेत, त्यानूसार मंगरुळपीर तालुक्यातील वेगवेगळ्या शाळेवरुन आठ जि.प.शाळेतील शिक्षकांच्या बदल्या येथील जिल्हा परिषद हायस्कुल येथे झाल्या. ही बदलीप्रक्रीया आॅनलाईन पध्दतीने राबविण्यात आली.पोर्टलमध्ये दिलेल्या शाळेच्या पयार्यावरुन श्रीकृष्ण ज्ञानदेव ठाकरे, सुनिल प्रल्हादराव धोञे, निलिमा राजुरकर, बिष्णु ज्ञानदेव गावंडे, सुशिल ज्ञानदेव गावंडे, सुशिल नारायण डहाने, विनोद मधुकर ऊंद्रे, राजेश बाळासाहेब दहातोंडे, हिरा गुणवंत खैरे या आठ शिक्षकांनी बदलीसाठी मंगरुळपीर येथील जिल्हा परिषद माध्यमिक व ऊच्च माध्यमिक विद्यालय हा पर्याय निवडला होता.त्याप्रमाने आॅनलाइन प्रक्रीयेनुसार बदली झाली. सबंधीत शिक्षकांना सबंधीत शाळेवर बदली झाल्याचा आदेश शासन निर्णय ग्रामविकास विभाग क्रमांक ४८१७/प्र.क्र.७/आस्था.१४,दि.२७-०२-२०१७ मिळाला. त्यानुसार जि.प. माध्यमिक व ऊच्च माध्यमिक विद्यालय मंगरुळपीर(युडायस २७०६०३०२९२३)येथे रुजु होन्यासाठी आदेश मिळाला.आदेश मिळ्याल्यानंतर तात्काळ बदली झालेल्या ठिकाणी रुजु व्हावे असे स्पष्ट नमूद केले . सर्व शिक्षक आपआपल्या शाळेवरुन कार्यमुक्त होवून रुजु होन्याकरीता बदली झालेल्या शासकीय ऊच्च माध्यमिक व माध्यमीक शाळेत २५ मे रोजी गेले असता शाळेचे प्रभारी प्राचार्य उपस्थित नव्हते. त्यामुळे तेथील लिपीकाला रुजु करुन घेणेसाठी आदेशपञ, कार्यमुक्ती अहवाल व विनंती अर्ज दिले असता त्यांनी कागदपत्रे आणी अर्ज घेन्यास प्र.प्राचार्य यांनी सुचित केल्यानुसार नकार दिला. सकाळी ९ वाजतापासुन तर दुपारी २ वाजेपर्यत प्र.प्राचार्य यांचेशी या आठ शिक्षकांनी दुरध्वनीवरुन संपर्क साधला असता त्यांनी शाळेवर रुजु करुन घेन्यास टाळाटाळ केली असा आरोप शिक्षकांनी केला आहे. त्यानंतर २६ मे २०१८ ला सकाळी आठ वाजता वर नमूद आठही शिक्षक सदर शाळेवर हजर झाले आणी बदली आदेश, कार्यमुक्ती अहवाल आणि विनंती अर्ज मुख्याध्यापक यांना सादर केले आणी शाळेवर रुजु करुन घेन्याची विनंती केली परंतु विनंती अर्जावर मुख्याध्यापक बि.टी.खांबलकर यांनी तुर्त ३१ मे २०१८ पर्यत रुजु करुन घेवु नये असे मला मार्गदर्शन मिळाले असे सांगुन रुजु करुन घेवु शकत नाही असा अभिप्राय दिला . त्यांतर त्या आठ शिक्षकांनी गटशिक्षण अधिकारी, मंगरुळपीर यांना आपल्या अधिकारामध्ये एकतर्फी जि.प.(मा.शा.) माध्यमिक व ऊच्च माध्यमिक विद्यालय मंगरुळपीर येथे रुजु करुन घ्यावे अथवा आपल्या कार्यालयात रुजु करुन घ्यावे आणी मुख्य कार्यकारी अधिकारी वाशिम यांचेकडे न्याय मागन्याची परवानगी द्यावी असे लेखी निवेदन सादर केले.नंतर शिक्षणाधिकारी वाशिम यांनाही हे आठ शिक्षक स्वत: भेटले पण पोर्टलमध्ये चुकीने जि.प.हायस्कुल मंगरुळपीरचे नाव आले त्यामुळे तुमची बदलीच नियमाला धरुन नाही , त्यामुळे सबंधीत शाळेवर रुजु करुन घेता येणार नाही असे सांगीतले. जर जि.प.शाळेच्या प्राथमिक शिक्षकांना हायस्कुलवर बदली करता येत नाही तर मग याआधी प्राथमिक शिक्षकांच्या तिथे बदल्या कशा झाल्या? पोर्टलमध्ये चुकीने जि.प.हायस्कुलचे नाव कसे आले? ग्रामविकास मंञालयाचा बदली आदेश असुनही सदर शाळेने रुजु करुन घेन्यास नकार दिला तर मग या शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली तर नाही ना? रुजु करुन घेन्यास नकारामागे काही राजकारण तर नाही ना? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. यासंदर्भात प्रशासन काय भुमिका घेते याकडे शिक्षण विभागासह तालुक्यातील शिक्षकांचे लक्ष लागले आहे.
आठ शिक्षकाना रुजु करुन घेण्याची जबाबदारी जिल्हा परिषद मुख्याध्यापकाची आहे .
- मंजुषा कौसल गटशिक्षणाधिकारी