शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

 रेमडेसिवीरच्या  दर सवलतीमुळे विक्रेत्यांसह खासगी दवाखान्यांच्या वसुलीस बसणार चाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 12:29 PM

Remdesivir Injectio in concessions Rate in Washim जनआरोग्य योजनेंतर्गत हे इंजेक्शन २३६० रुपयांत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

ठळक मुद्देसवलतीच्या दरात हे इंजेक्शन उपलब्ध केले जाणार.केवळ डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवरच ते विकता येणार आहे.

वाशिम:  कोरोनाबाधित रुग्णांसाठी आवश्यक असलेले रेमडेसिव्हर इंजेक्शनची किेंमत सामान्य रुग्णांच्या खिशाला परवडत नाही. किंमत जासत असल्याने या इंजेक्शनअभावी अनेकांना जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे सामान्यातल्या सामान्य कोरोनाबाधित रुग्णास स्वस्त दरात हे इंजेक्शन उपलब्ध व्हावे म्हणून जनआरोग्य योजनेंतर्गत हे इंजेक्शन २३६० रुपयांत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील औषधी दुकानावर परवानगीने विक्रेत्यांना हे इंजेक्शन विक्रीसाठी उपलब्ध करून ठेवता येणार आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे आजवर मनमानी पद्धतीने इंजेक्शनची किमंत वसूल करणारे खासगी कोविड सेंटर आणि जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांवर चाप बसणार आहे. येत्या काही दिवसांतच जिल्ह्यात हे इंजेक्शन उपलब्ध सवलतीच्या दरात हे इंजेक्शन उपलब्ध केले जाणार असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. 

प्रिस्क्रिप्शनवरच मिळणार इंजेक्शन सर्वसामान्य रुग्णांना कोविड उपचारासाठी रेमडेसिव्हिर इंजेक्शन स्वस्तदरात उपलब्ध करण्यात येणार असले तरी, त्याचा गैरफायदा घेतला जाऊ नये म्हणून केवळ डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवरच ते विकता येणार आहे.    -डॉ. मधूकर राठोड, जिल्हा शल्यिचिकित्सक, वाशिम

सवलतीत इंजेक्शन मिळण्यासाठी नियमरेमडेसिव्हिर इंजेक्शन निर्मिती करणाऱ्या कंपनीमार्फत दिवसाला शंभर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. दुकानदारास हे इंजेक्शन २८०० रुपयांस मिळणार असून, त्यावर १२ टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. त्यामुळे दुकानदारास हे इंजेक्शन विक्री करताना केवळ पाच टक्के कमीशनवर विकावे लागणार आहे. त्यामुळेच कोविडच्या रुग्णांना आता ५८०० रुपयांऐवजी २३६० रुपयांना हे इंजेक्शन मिळू शकणार आहे. रेमडेसिव्हिर इंजेक्शन कुणाला द्यायचे याचा अधिकार जिल्हा शल्य चिकित्सक व त्यांनी नेमलेले वैद्यकीय अधिकाऱ्यांना राहणार असून, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी असलेल्या प्रिस्क्रीप्शनवरच हे इंजेक्शन संबंधित औषधी दुकानदाराकडून विकत घेता येणार आहे. 

मेडिकलची यादी 

  • प्रधानमंत्री जनऔषधी, 
  • मराठा मेडिकल वाशिम,
  • न्यू मराठा मेडिकल वाशिम,
  • बाहेती मेडिकोज वाशिम,
  • सिक्यूरा हॉस्पिटल,
  • माऊली मेडिकल वाशिम,
  • लक्ष्मी मेडिकोज वाशिम, न्यू दागडिया मेडिकल, 
  • नाथ मेडिकल वाशिम,
  • काकडे मेडिकल वाशिम,
  • जनता मेडिकल वाशिम,
  • नवकार मेडिकल वाशिम 
टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या