यासंदर्भातील निवेदनात नमूद आहे की, शहरातील जुन्या नगर परिषदेमागे असलेल्या नंदीपेठमध्ये दर्शनी प्रवेशव्दाराजवळील रस्ता गेल्या अनेक महिन्यापासून दुुरुस्त करण्यात आला नाही. याठिकाणी नगर परिषदेने केवळ गिट्टी व दगड आणून टाकले आहेत. त्याचा ये-जा करणाºया नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक महिन्यापासून रस्ता दुरूस्त न झाल्यामुळे अनेक अपघातसुध्दा घडले आहेत. रस्त्याच्या दुरुस्तीअभावी रहिवाशांना व वाहनचालकांना होणारा त्रास पाहता सदर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्याबाबत संबंधीत विभागाला आदेशित करावे, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. निवेदन देताना मनसेचे प्रभारी जिल्हाध्यक्ष मनिष डांगे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष नितीन शिवलकर, महिला सेनेच्या बेबी धुळधुळे, तालुकाध्यक्ष मोहन कोल्हे, महंमद नौरंगाबादी, अर्जुन साबळे, निखील बुरकुले, आकाश कुटे आदी उपस्थित होते.
नंदीपेठीमधील रस्ता दुरूस्त करा; अन्यथा आंदोलन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 4:43 AM