---------
‘शौच’वारीला ब्रेकचा प्रयत्न अयशस्वी
वाशिम : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यात १ लाख ६९ हजार शौचालयांचे बांधकाम झाले असले तरी उघड्यावर शौचवारी सुरूच आहे. याला आळा घालण्यासाठी गुड मॉर्निंग पथक सक्रिय करण्याच्या सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी दिल्या हाेत्या. मात्र, अद्याप याला ब्रेक बसला नसल्याचे ग्रामीण भागातील उघड्या शाैचवारीवरून दिसून येते.
---------
कामरगाव येथे कृत्रिम पाणीटंचाई
कामरगाव : जवळपास २५ हजार लोकसंख्या असलेल्या कामरगाव येथे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीपुरवठ्याच्या एका विहिरीचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट सुरू असल्याचे चित्र दिसते.
---------
शेलुबाजार परिसरात मेंढ्यांचे कळप
शेलुबाजार : गुजरात, आंध्र प्रदेशातील मेंढपाळ महाराष्ट्रात आपल्या शेळ्या, मेंढ्या घेऊन येत आहेत.
.......
भुखंडाची खरेदी करण्याची मागणी
वाशिम : राज्याच्या इतर जिल्ह्यांत भूखंडाची शासकीय खरेदी - विक्री सुरू असताना वाशिम जिल्ह्यात गेल्या अनेक महिन्यांपासून खरेदी बंद आहे. ही खरेदी सुरू करून भूखंडधारकांना दिलासा देण्याची मागणी भीमसंग्राम सामाजिक संघटनेतर्फे जिल्हाधिकारी यांचेकडे निवेदनाव्दारे केली आहे.