लोकमत न्यूज नेटवर्ककरंजी : करंजी लहाने या गावाला सन २०१० -२०११ मध्ये तंटामुक्त मोहीमेचा तीन लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला होता. त्या पुरस्कार रक्कमेचा विनियोग शासनाच्या परिपत्रकानुसार केला नाही. तेव्हा या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करुन दोषी व्यक्तीवर योग्य ती कारवाई करण्याची लेखी तक्रार तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष व सदस्यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे. परंतु यावर अद्यापपर्यंत कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. करंजी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष नारायण निवृत्ती लहाने यांनी जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम, व पंचायत समिती मालेगाव यांना लेखी देवुन गावाला मिळालेल्या तीन लाख रुपयाचा पुरस्कार शासन परिपत्रकाप्रमाणे केला नाही , तेव्हा सदर कामाची सखोल चौकशी करुन कारवाईची मागणी केली होती. जवळपास एक महिन्यानंतर सदर तक्रारीची दखल उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेवुन सदर पुरस्कार रक्कमेचा गैरव्यवहार केल्याबाबत सखोल चौकशी करुन आपला अहवाल स्वयंस्पष्ट अभिप्रायासह कार्यालयास सादर करण्याचे पत्र गट विकास अधिकारी, पंचायत समिती, मालेगाव यांना दिले होते. एक महिन्याचा कालावधी उलटुनही गटविकास अधिकारी यांनी अद्यापपर्यंत कोणतीच चौकशी केल्या नसल्याचा आरोप तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष नारायण लहाने यांनी सांगितले . तसेच जिल्हाधिकारी यांना दिलेल्या लेखी पत्रात सर्व गैरव्यवहार हा ग्रामपंचायत सचिव व संबंधीत सरपंच यांनी केला असे म्हटले आहे. २०१० ते २०१७ या सहा ते सात वर्षात आतापर्यंत तीन सचिव बदलुन गेले आहेत. प्रत्येकांनी पुरस्कार रक्कमेचा गैरव्यवहार केला असल्याचा संशय व्यक्त केला आहे. वारंवार रक्कमेच्या विनियोगाबाबत विचारुनही माहिती देत नसल्याामुळे तंटामुक्त अध्यक्ष यांनी १८ आॅक्टोंबर रोजी माहितीच्या अधिकारात पत्र देवुन माहिती मागितली आहे. गावकºयांनी गावाला पुरस्कार मिळवुन दिला,मात्र त्या रक्कमेचा योग्य प्रकारे विनियोग केला नाही, त्यामुळे गाव समितीचा उत्साह कमी झाला असुन योग्य न्याय देण्याची मागणी समितीने केले आहे. २८ आॅक्टोंबर ग्रामपंचायत सचिव यांना भ्रमणध्वनी लावला असता ते कव्हरेज क्षेत्राच्याबाहेर होते.
तंटामुक्त पुरस्कार रक्कमेचा गैरवापर झाल्याची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 10:37 PM
करंजी : करंजी लहाने या गावाला सन २०१० -२०११ मध्ये तंटामुक्त मोहीमेचा तीन लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला होता. त्या पुरस्कार रक्कमेचा विनियोग शासनाच्या परिपत्रकानुसार केला नाही. सखोल चौकशी करुन दोषी व्यक्तीवर कारवाई करण्याची तक्रार तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष व सदस्यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे.
ठळक मुद्देसखोल चौकशी करा दोषिंवर कारवाईची मागणी