संसाराला हातभार लागावा याकरीता गृहउद्योग, अन्य उद्योग उभारणीसाठी रिसोड येथील अनेक महिलांनी विविध फायनान्स कंपन्यांकडून वैयक्तिक कर्ज घेतले. व्यवसायही सुरू केले. कर्जाच्या हप्त्याची नियमित परतफेडही सुरू होती. परंतु, कोरोना विषाणू संसर्गामुळे गतवर्षी २४ मार्चपासून लॉकडाऊन व संचारबंदी असल्याने छोटे, मोठे गृहउद्योग व अन्य उद्योग ‘लॉकडाऊन’ झाले होते. यावर्षीदेखील गत दोन महिन्यांपासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे कर्जाची परतफेड कशी करावी, अशी चिंता या महिलांना लागली आहे. त्यातच विविध फायनान्स कंपन्यांकडून कर्जाच्या वसुलीसाठी तगादा सुरू असल्याने चिंता अधिकच वाढली आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे घरगुती व्यवसाय, रोजमजुरी, छोटे उद्योग प्रभावित झाले असून, उपासमारीची वेळ आली. आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक झाल्याने अनेकजण कर्जाचे हप्ते भरू शकत नाही. त्यामुळे फायनान्स कंपन्याचे कर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी सत्यमेव जयते फाउंडेशनतर्फे करण्यात आली.
कर्ज वसुलीसाठी फायनान्सकडून तगादा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 4:40 AM