तहसील कार्यालयात काढण्यात आलेले आरक्षण आदित्य रामराज कांबळे, रा. मोहगव्हान या नऊवर्षीय मुलाच्या हाताने चिठ्ठ्या काढण्यात आल्या.
तालुक्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील सरपंचपदाचे आरक्षण पूर्वीप्रमाणेच कायम असून महिला आरक्षण हे ४ जानेवारी रोजी वाशिम येथे निघणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मंगळवारी नागरिकांचा मागासप्रवर्गकरिता आरक्षण काढण्यात आले असता ते चिंचखेडा, पिंपळखुटा संगम, ईचा, हिसई, कंझरा,पार्डी ताड, पारवा, तपोवन, शेलगाव, निंबी, चांधई, अरक, नांदखेडा, शेगी, पिंपळगाव, रामगड, लाठी, दाभडी व सारसीबोथकरिता निघाले, तसेच गिम्भा येथील आरक्षण नामाप्र हे सरळ सरळ काढण्यात आले. कोठारी,गोलवाडी,बोरव्हा खु,चिखलागड, माळशेलू,बेलखेड, दस्तापूर,पिंप्री खु,सावरगाव, तऱ्हाळा, कोळंबी, चिखली, आसेगाव, कळंबा बो, भूर, शिवणी रोड, वनोजा, मोतसावंगा,गोग्री, दाभा, वसंतवाडी हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे. आता महिला आरक्षणाकडे अनेकांचे लक्ष लागून असून महिला आरक्षण जाहीर झाल्यानंतर पुढील चित्र स्पष्ट होणार आहे.