लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा : कारंजा नगर परिषदेंतर्गत शासनाच्या धोरणानुसार २८ आॅक्टोंबरच्या शासन निर्णया नुसार ३ टक्के निधी अपंगाच्या कल्याणाकरिता खर्ची करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने कारंजा नगर परिषदेमार्फत स्थानिक महेश भवन या ठिकाणी कारंजा शहरातील दिव्यांग बांधवांचा मेळावा २५ सप्टेंबर सोमवार रोजी आयोजित करण्यात आला होता. सदर मेळाव्याच्या माध्यमातुन दिव्यांग बांधवांना शासनाच्या विविध योजनेची माहिती व्हावी, दिव्यांग बांधवाचे विविध प्रश्नाला वाचा फोडावी, या दृष्अीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी न.प. अध्यक्ष शेषराव ढोके, उपाध्यक्ष एम.टी.खान, न.प.चे सर्व सन्माननीय सभापती व सर्व सदस्य गण यांच्या उपस्थितीत सर्वाचा सत्कार समारंभ घेवुन न.प. मुख्याधिकारी प्रमोद वानखडे यांनी प्रास्ताविक सादर करुन पुढील कार्यक्रमास ब्रम्हदेव बांडे व शहर अध्यक्ष रमेश सोनोने या संघटनेचे पदाधिकारीच्या उपस्थित दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणुन स्व.आशाताई चव्हाण बहूउद्देशीय संस्थेच्यावतीने डॉ.रमेश चव्हाण अस्थिरोग तज्ञ यांनी दिव्यांग बांधवांच्या विविध योजनेबाबत व आरोग्याबाबत तसेच त्यांच्या पुनर्वसनाबाबत अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. त्याच बरोबर षटकोन कौशल विकास संस्थेच्या सहारे, प्रमोद राठोड यांनी दिव्यांगाचा कौशल्य प्रशिक्षणाबाबत मोफत प्रशिक्षण देणे बाबत मार्गदर्शन करण्यात आले. न्यु.इंडिया इन्सुरन्स कंपनीच्या कारंजा शाखेचे व्यवस्थापक दिनेश गणात्रा यांनी स्वास्थ विमा योजनेचा लाभ घेण्याबाबत आव्हान केले. सदर कार्यक्रमाला अध्यक्ष , उपाध्यक्ष यांनी दिव्यांग बांधवांना पुष्पगुच्छ देवुन हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी उपस्थित दिव्यांग बांधव आसमा परवीन, अजीम शा.मकबुल शा, वृषाली नागरपुरे, इलियास मौलाना यांनी तसेच नगरसेवक, मुजाहिन भाई यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी नगराध्यक्ष महोदयांनी दिव्यांग बांधवांच्या अडीअडचणीसाठी व विकासासाठी नगर परिषद सर्वतोपरी प्रयत्न करुन पाठीशी उभे आहे असे निवेदन केले. सदर कार्यक्रमास नगर परिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेवुन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. सदर कार्यक्रमाचे संचालन हेमंत चवरे यांनी केले व अपंगाच्या योजनेबाबत न.प.सहा. प्रकल्प अधिकारी धम्मपाल पंडीत यांनी माहिती दिली. शेवटी आभार प्रदर्शन नंदकिशोर डाखोरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदेश मोरे, दरेकर, सि.आर.दंडवते, अभियंता, बनसोड, प्राथ. शिक्षणाधिकारी रमेश सरगर, प्रफुल आग्रेकर, बाळकृष्ण देशमुख, सहा.कार्यालय पर्यवेक्षक वसंत पाटील, करनिरीक्षक राजु खंडारे, प्यारंचंद अदिवाल, गुलशन गेडाम, अग्नीशमन अधिकारी इलियास अहेमद रोखपाल, प्रविण मोहेकर, बांधकाम अभियंता विशाल सैव विद्युत अभियंता, विशाल वाघ, विधी व कामगार पर्यवेक्षक साखरकर, सुरेखा सोनटक्के, शरद काळे, मुकूंद लोखंडे व कर विभागातील कर्मचारी विनय वानखडे, आरोग्य निरीक्षक व आरोग्य विभागातील कर्मचारी महिला बचत गट व बचत गटातील सर्व महिला, यांनी परिश्रम घेतले.
दिव्यांग मेळाव्यास प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 8:02 PM
कारंजा : कारंजा नगर परिषदेंतर्गत शासनाच्या धोरणानुसार २८ आॅक्टोंबरच्या शासन निर्णया नुसार ३ टक्के निधी अपंगाच्या कल्याणाकरिता खर्ची करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने कारंजा नगर परिषदेमार्फत स्थानिक महेश भवन या ठिकाणी कारंजा शहरातील दिव्यांग बांधवांचा मेळावा २५ सप्टेंबर सोमवार रोजी आयोजित करण्यात आला होता.
ठळक मुद्देदिव्यांग बांधवांना शासनाच्या विविध योजनेची माहिती महेश भवन येथे पार पडला मेळावा