मालेगाव (वाशिम): यंदाच्या हंगामातील सोयाबीनची नाफेडमार्फत हमीभावाने खरेदी करण्यासाठी आॅनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. मालेगावात या नोंदणीला प्रतिसाद मिळत असून, नोंदणीच्या पहिल्याच दिवशी ११ आॅक्टोबरला ४५० शेतकºयांनी नोेंदणी केली आहे. यंदाच्या हंगामाती सोयाबीन बाजारात विक्रीसाठी आल्यानंतर सोयाबीनचे दर कोसळत चालले आहेत. यामुळे शेतकरीवर्गात निराशेचे वातावरण पसरले असून, शासनाने तातडीने हमीभावाने खरेदी सुरू करावी, अशी मागणी शेतकरी व लोकप्रतिनिधींच्यावतीने करण्यात येत होती. या पृष्ठभूूमीवर शासनाने नाफेडमार्फत हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी आॅनलाईन नोंदणी करण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या. त्यानुसार ११ आॅक्टोबरपासून शासकीय खरेदी केंद्रावर सोयाबीन विकण्यासाठी आॅनलाइन नोंदणी सुरू झाली आहे. ही नोंदणी प्रक्रिया ३० आॅक्टोबरपर्यंत राहणार असून, मालेगाव येथे या प्रक्रियेला मोठा प्रतिसाद लाभत आहे. या प्रक्रियेंतर्गत मालेगाव येथे पहिल्याच दिवशी ४५० शेतकºयांनी सोयाब्ीनच्या विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी केली. आॅनलाईन नोंदणीसाठी शेतकºयांनी एकच गर्दी केल्याने काही काळ नोंदणी प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला होता. दरम्यान, या प्रक्रियेंतर्ग शेतकºयांना बँकेचे खाते पुस्तक, आॅनलाईन सातबारा, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, ८ अ, तसेच वाशिम जिल्ह्यातील रहिवासी असल्याचा पुरावा, आदि कागदपत्रे सोबत आणावी लागणार आहेत.
मालेगावात नाफेडच्या सोयाबीन खरेदीसाठी नोंदणीस प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 2:43 PM