शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
7
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
8
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
9
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
10
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
11
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
12
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
13
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
14
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
15
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
16
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
17
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
18
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
19
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
20
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

नाफेडच्या खरेदीला प्रतिसाद मिळेना: उडिद, मुगाची खरेदी अल्प 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 2:50 PM

वाशिम: नाफेडची सोयाबीन खरेदी अद्याप सुरू झालेली नसताना जिल्ह्यात नाफेडच्या मुग आणि उडिद खरेदीलाही अतिशय अल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: नाफेडची सोयाबीन खरेदी अद्याप सुरू झालेली नसताना जिल्ह्यात नाफेडच्या मुग आणि उडिद खरेदीलाही अतिशय अल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे. मुग आणि उडिदाच्या विक्रीसाठी ७६२४ शेतकºयांनी नोंदणी केली असताना यातील केवळ २४७ शेतकºयांच्या शेतमालाची खरेदी होऊ शकली आहे.शासनाने यंदा मुगाला ६९७५ रुपये प्रति क्विंटल, तर उडिदाला ५६०० रुपये प्रति क्विंटलचे हमीभाव घोषीत केले असून, शासनााच्यावतीने होणाºया नाफेडच्या खरेदीत २२ नोव्हेंबरपूर्वीच जिल्ह्यातील ६२० शेतकºयांनी मुगाच्या विक्रीसाठी, तर ७००४ शेतकºयांनी उडिदाच्या विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणीही केली आहे. तथापि, २१ नोव्हेंबर पर्यंत जिल्ह्यात २३० शेतकºयांच्या १३९६.९० क्विंटल उडिदाची, तर १७ शेतकºयांच्या केवळ ६३.६० क्विंटल मुगाची खरेदी नाफेडकडे होऊ शकली आहे. या उलट बाजार समित्यांमध्ये व्यापाºयांकडून उडिदाला कमाल ४८००, तर मुगाला कमाल ५४०० रुपये प्रति क्विंटलचे दर मिळत असतानाही शेतकरी नाफेडऐवजी व्यापाºयांकडेच उडिद मुग विक्रीला प्राधान्य देत असल्याचे बाजार समित्यांत होणाºया मुग आणि उडिदाच्या आवकीवरून स्पष्ट होत आहे. चुकाºयास होणारा विलंब कारणीभूतगत दोन तीन वर्षांत शासकीय खरेदी केंद्रांवर शेतकºयांचा भ्रमनिरास झाला. या केंद्रांवर मालमोजणीसाठी होणारा विलंब, त्यामुळे चार चार दिवस होणारा मुक्काम आणि एवढे करूनही विकलेल्या शेतमालाच्या चुकाºयासाठी करावी लागणारी महिनोगणतीची प्रतिक्षा, आदि कारणांमुळे शेतकºयांनी शासकीय खरेदी केंद्रांकडे पाठ केली आहे. प्रत्यक्षात शासनाचे यंदाचे मुगाचे हमीभाव आणि बाजारात मिळत असलेल्या दरात जवळपास प्रति क्विंटल मागे १६०० रुपयांची तफावत आहे, तर उडिदाच्या दरात सहाशे ते आठशे रुपयांची तफावत आहे, असे असतानाही नैसर्गिक आपत्तीने अडचणीत सापडलेल्या शेतकºयांना विकलेल्या शेतमालाचा हातोहात पैसा हवा असल्याने शासकीय खरेदी केंद्र ओस पडले आहेत.

टॅग्स :washimवाशिमMarket committee washimबाजार समिती वाशिम