कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशांचे पालन करीत यावर्षी शिवजयंतीनिमित्त विविध उपक्रम मर्यादित स्वरूपात घेण्यात आले. मराठा सेवा संघाच्या पुढाकारातून मागील २१ वर्षांपासून सार्वजनिक शिवजयंती उत्सव साजरा केला जातो. यावर्षीही विविध उपक्रम राबविण्यात आले. जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा सरचिटणीस सुनिता कढणे यांनी बालवेशभूषा स्पर्धचे आयोजन केले होते. ‘शिवकालीन मावळे’ या विषयावर ही स्पर्धा घेण्यात आली. त्यात १५ बालकांनी सहभाग नोंदविला. उत्कृष्ट वेशभूषेसाठी प्रशांती कढणे, भक्ती कढणे, वेदांत घुगरे, दर्शन इढोळे, प्रथमेश काळबांडे या पाच बालकांची निवड करण्यात आली. त्यांना विभागीय अध्यक्ष संजीवनी बाजड यांच्या मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष अनिता कोरडे यांच्याहस्ते पारितोषिके देण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भारती नायक, वैशाली काळबांडे, अनिता गवई आदींनी परिश्रम घेतले.
शिवजयंतीनिमित्त बाल वेशभूषा स्पर्धेला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 4:30 AM