प्राचार्य डॉ.विजयराव तुरुकमाने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रा.डॉ.प्रमोदकुमार नंदेश्वर, प्रा.संजय टिकार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले. प्रा.नंदेश्वर यांनी कार्यक्रमाचा उद्देश विषद केला. प्राचार्य तुरुकमाने यांनी भारतीय संविधानाचे लोकशाही संवर्धनातील महत्त्व सांगितले. सर्वांनी संविधानिक मार्गाचा स्वीकार करून तसे वर्तन करावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रा.टिकार यांनी संविधानातील विविध तरतुदीचे विश्लेषण करून अधिकार व कर्तव्यांप्रती नागरिकांनी सजग राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन विलास नरवाडे यांनी केले, तर आभार गजानन शेवाळे यांनी मानले. कार्यक्रमास प्रा.के. एस. वाघाडे, प्रा.सुरेश जुनघरे प्रा.ए. एन. बोंडे, डॉ. के. के. बुधवंत डॉ.ए. जी. वानखेडे, डॉ.जयंत मेश्राम, डॉ.मनोज नरवाडे, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
संविधान जागृती कार्यक्रमास प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 4:36 AM