सामाजिक कार्यकर्ते अरुण बळी, प्रा. पी. एस. खिराडे, महेंद्र उंबरकर, संतोषराव भालेराव, अशोक शर्मा, शंकर घुगे, काळे आदींनी लसीकरणासाठी विशेष सहकार्य केले. सध्या कोरोना संसर्गाने उग्र रूप धारण केले आहे. यापासून स्वत:सह कुटुंबाचा बचाव करण्यासाठी लस घेणे गरजेचे आहे. याशिवाय सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, वारंवार हात धुणे व तोंडाला मास्क लावणे आवश्यक असल्याचे मत नगराध्यक्ष बळी यांनी व्यक्त केले.
शिबिराच्या यशस्वितेसाठी नलिनी भालेराव, अरुणा क्षीरसागर, जयश्री खिराडे, आशा घुगे, रेखा नवले, शारदा मुंडे, लता काळे, संध्या उंबरकर, लता घुगे, संजीवनी नवघरे, सुनीता रणबावळे, सिंधू भालेराव, मीरा इंगळे आदींनी पुढाकार घेतला. लसीकरणासाठी ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी संतोष ओझा, चित्रा देशपांडे, परिचारिका एस. एम. लांडे, डॉ. हजारे, नगर पंचायतचे कर्मचारी माणिक मोहळे, महादेव राऊत, बंडू इंगोले यांनी सहकार्य केले.