दरवर्षी राम नवमीला संत सेवालाल महाराज जन्मोत्सव यात्रा भरते. याकरिता देशभरातून बंजारा समाज बांधवांसह विविध समाजातील लाखो भाविक येतात; मात्र कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पोहरादेवी येथील यात्रा रद्द करण्याचा निर्णय पोहरादेवी तीर्थक्षेत्र येथील महंत, विश्वस्त आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला होता. पोहरादेवी यात्रेसाठी अनेक वर्षांपासून देशभरातून विविध समाजातील लाखो लोक येतात. सध्या सर्वत्र कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला असून, भाविकांचे आरोग्य सुरक्षित राहावे, यासाठी कुणीही पोहरादेवीत येऊ नये, असे आवाहन करण्यात आले होते. पोहरादेवीकडे जाणाऱ्या सर्व मार्गांवर पोलीस बंदोबस्तदेखील ठेवण्यात आला होता. ठिकठिकाणी बंदोबस्त आणि चेकपोस्ट असल्याने या परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. भाविकांनीदेखील कोरोना विषाणू संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेता घरी राहूनच रामनवमी तसेच संतमहंतांच्या दर्शनाचा लाभ घेतला. त्यामुळे गतवर्षीप्रमाणेच यावर्षीदेखील पोहरादेवी परिसरात शुकशुकाट दिसून आला.
संतमहंतांच्या आवाहनाला भाविकांचा प्रतिसाद; पोहरादेवीतील गर्दी टळली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 4:41 AM