पहिल्या सत्राचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. विवेक गुल्हाने, उद्घाटक म्हणून प्रसिद्ध इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार कोल्हापूर, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून निवृत्त आयएएस अधिकारी, जागतिक लिंगायत महासभेचे प्रमुख डॉ. एस. एम. जामदार, बेंगळुरू हे मुख्य व्याख्याता म्हणून उपस्थित होते. उद्घाटक म्हणून बोलताना डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले की, रणनीती, राजनीती, कलावंतांच्या व साहित्यिकांच्या योगदानाने समृद्ध असा असून अशा समृद्ध परंतु अज्ञात इतिहासाला सत्य स्वरूपात पुढे आणण्यासाठी लिंगायत अभ्यासकांनी पुढाकार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या अज्ञात समृद्ध इतिहासावर आपण सर्वांनी लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रमुख व्याख्याते डॉ. जामदार म्हणाले की, विजयनगर साम्राज्यापासून ब्रिटिशांच्या आगमनापर्यंत वेगवेगळ्या लिंगायत नायकांनी, देसायांनी राजे, राण्यांनी मुस्लिम आमदानीत मोठा संघर्ष केला. हा समृद्ध इतिहास अनेक खंडांमध्ये लिखित स्वरूपात भारतीयांकडे सत्य रूपामध्ये आणण्याची योजना लवकरच प्रत्यक्षात येत असल्याचे त्यांनी सांगितले. प्राचार्य डॉ. विवेक गुल्हाने यांनी महाविद्यालयाच्या माध्यमातून राबविल्या जात असणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी दिली. शोधनिबंध वाचनाच्या द्वितीय सत्रात डॉ. नलिनी वाघमारे पुणे यांनी संशोधकांनी वाचलेल्या शोधनिबंधाचा आढावा घेतला. यावेळी चाकूर येथील संशोधक उमाकांत चलवदे व लातूर येथील प्रा.डाॅ. भीमराव पाटील यांनी शोधनिबंधाचे वाचन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. संतोषकुमार गाजले, राजूभाऊ जुबरे, रत्नाकर लक्षट्टे, प्रास्ताविक सचितानंद बिचेवार यांनी केले तर आभार डॉ. हरीश घोडेकर यांनी मानले. परिषदेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे डॉ. जैन, डॉ. राठोड, डॉ. बनचरे, डॉ. शर्मा, वचन अकादमीचे विश्वस्त बाळासाहेब पाटील, बसवराज कनजे, डॉ. भीमराव पाटील, डॉ. रत्नाकर लक्षट्टे, राजू जुबरे यांच्यासह डॉ. विशाल पानसे यांनी तांत्रिक सहकार्य केले.