शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
2
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
3
PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
5
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
6
Lawrence Bishnoi : "लॉरेन्स बिश्नोई रोज सकाळी १०८ वेळा..."; वकिलाने सांगितल्या गँगस्टरच्या काही खास गोष्टी
7
"पक्षापेक्षा जास्त उमेदवाराचा विचार!" मनवा नाईकने केलं मतदान, म्हणाली, "स्थिर सरकार..."
8
तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीदिवशीच सोलापुरात ठाकरे गटाला धक्का! सुशीलकुमार शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
10
६ महिन्यांत 'या' शेअरमध्ये ५६५% ची वाढ; आता बोनस शेअर देण्याची तयारी, कोणता आहे स्टॉक?
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
12
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
13
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...
14
शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; "वरळीकर मतदार सूज्ञ..." 
15
चंदा कोचर यांच्याविरोधात कारवाई करू नका, उच्च न्यायालयाचे एसएफआयओला निर्देश 
16
Sharad Pawar: सुप्रिया सुळेंवर मतदानाच्या आदल्या दिवशी गंभीर आरोप; शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला!
17
विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
19
Jio New Recharge: केवळ इतक्या रुपयांमध्ये मिळणार वर्षभरासाठी अनलिमिटेड 5G डेटा; पाहा डिटेल्स
20
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ

बांधावर खते, बियाणे उपक्रमाला कारंजा तालुक्यात उंदड प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2020 5:38 PM

९ मेपर्यंत तालुक्यातील ३७६७ शेतकरी गटांनी विविध खते, बियाणे आणि इतर निविष्ठांसाठी कृषी विभागाच्या आॅनलाईन लिंकवर नोंदणी केली आहे. 

लोकमत न्युज नेटवर्ककारंजा (वाशिम): आगामी खरीप हंगामात शेतकºयांना शेताच्या बांधावर खते आणि बियाणे उपलब्ध करण्यासाठी कृषी विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाला कारंजा तालुक्यात उदंड प्रतिसाद लाभत आहे. या उपक्रमांतर्गत ९ मेपर्यंत तालुक्यातील ३७६७ शेतकरी गटांनी विविध खते, बियाणे आणि इतर निविष्ठांसाठी कृषी विभागाच्या आॅनलाईन लिंकवर नोंदणी केली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन विविध उपाय योजना करीत आहे. या अंतर्गत कृषीसेवा केंद्रात खरीप हंगामासाठी बियाणे, खते आणि इतर निविष्ठाच्या खरेदीसाठी होणारी गर्दी टाळण्याच्या उद्देशाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांच्या सुचनेनुसार जिल्हाभरात खते, बियाणे शेतकºयांच्या बांधावर हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यात शेतकºयांना कृषी विभागाने दिलेल्या लिंकचा आधार घेऊन आॅनलाईन नोंदणी करावी लागत आहे. या उपक्रमाला कारंजा तालुक्यात शेतकरी गटांचा उदंड प्रतिसाद लाभत असून, ९ मे पर्यंत या तालुक्यात ३७६७ शेतकरी गटांनी विविध निविष्ठांसाठी आॅनलाईन नोंदणी केल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी संतोष वाळके यांनी दिली. यात सोयाबीन बियाण्यांच्या २१९४७ बॅग, कपाशी पाकिटे ११८६४, तूर बियाणे २३३.७८ क्विंटल, उडिद, मुग बियाणे २२७६ बॅग, ज्वारी २१६ बॅग, अशी बियाण्यांची नोंदणी शेतकरी गटांनी केली, तर खतांमध्ये डीएपी खताच्या १६११० बॅग, १०:२६:२६ च्या ७४४४ बॅग, २०:२०:०:१३ च्या ११०८१ बॅग, एसएसपीच्या ४००२ बॅग, युरियाच्या ६१७० बॅग, १५:१५:१५: च्या ११८० बॅग, तसेच एमओपी खतांच्या २७५१ बॅगची नोंदणी शेतकरी गटांनी केली.  ८८ कृषीसेवा केंद्राच्या माध्यमातून निविष्ठा बांधावर कारंजा तालुक्यात नोंदणी केलेल्या ३७६७ शेतकरी गटांना त्यांनी केलेल्या  नोंदणीनुसार कारंजा तालुका कृषी अधिकारी कार्यालयातर्फे तालुक्यातील ८८ कृषी सेवा केंद्रांच्या माध्यमातून शेताच्या बांधावर खते, बियाणे आणि इतर निविष्ठा पोहोचविल्या जाणार आहेत. यासाठी मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून तालुका कृषी अधिकारी आणि त्यांच्या सहकाºयांनी नियोजन केले आहे. ९ मेपर्यंत तालुक्यातील ८६ कृषीसेवा केंद्रांच्या माध्यमातून ८३० शेतकºयांना घरपोस निविष्ठा पोहोचविण्यातही आल्या आहेत.

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी