.............
नव्या रस्त्याच्या कडेला वृक्षलागवडीची मागणी
वाशिम : वाशिम ते अनसिंग या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम बऱ्याच ठिकाणी पूर्ण झालेले आहे. असे असताना कापलेल्या वृक्षांच्या ठिकाणी नव्याने वृक्षलागवड करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. वृक्षांअभावी रस्ते विरळ झाले असून नव्याने वृक्षांची लागवड करण्यात यावी, अशी मागणी एकनाथ पांडे यांनी बुधवारी बांधकाम विभागाकडे केली.
...............
कोरोनापासून सुरक्षित राहण्याचे आवाहन
वाशिम : कोरोनापासून बचावासाठी शासनाने आखून दिलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करून स्वत:चे रक्षण करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी केले आहे.
...........
सिलिंडर तुटवड्याचा प्रश्न निकाली
वाशिम : मध्यंतरी आॅक्सिजन सिलिंडरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला होता. या प्रश्नाकडे जिल्हा प्रशासनाने वेळीच लक्ष पुरविल्याने आता हा प्रश्न निकाली निघून पुरेशा प्रमाणात सिलिंडर मिळत आहेत.
........................
रुग्णवाहिकांमुळे रुग्णांची झाली सोय
वाशिम : आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत समावेश असलेल्या वाशिम जिल्ह्याला नीती आयोगाकडून मिळालेल्या निधीतून १० रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्या. त्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना दिल्या असून यामुळे रुग्णांची सोय झाली आहे.
....................
अनसिंग येथे आरोग्य तपासणी
वाशिम : तालुक्यातील अनसिंग येथे कोरोना रुग्णांचा आकडा गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात घटलेला आहे. असे असले तरी नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यासोबतच आरोग्य विभागाने रविवारी आरोग्य तपासणी मोहीम राबविली.
..................
बाजारपेठेतील गर्दी नियंत्रणाबाहेर
वाशिम : नागरिकांची गैरसोय टळावी, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने गेल्या अनेक दिवसांपासून निर्बंध पूर्णत: शिथिल केले; मात्र त्याचा गैरफायदा घेतला जात असून सकाळच्या सुमारास गर्दी नियंत्रणाबाहेर जात आहे. दिवसभरही मुख्य बाजारपेठेत गर्दी कायम राहत असून वाहतूक वारंवार विस्कळीत होत असल्याचे दिसत आहे.