वाशिम : काेराेना संसर्गामुळे बंद असलेल्या एसटी बसेस ७ जूनपासून सुरू करण्यात आल्यात. पहिल्याच दिवशी एसटी बसला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद लाभल्याचे बस स्थानकातील गर्दीवरून दिसून आले.
जिल्ह्यातील चारही आगारांकडून सर्व बसेस साेडण्याचे नियाेजन करण्यात आले आहे. प्रवाशांनुसार बसेस साेडण्यात येत आहेत. परजिल्हयातील बसेसही धावत असल्याने नागरिकांना साेईचे झाले आहे. ७ जून राेजी सकाळी ९ वाजता बस स्थानकात अपडाऊन करणारे कर्मचारीही दिसून आलेत. परजिल्ह्यातील हिंगाेली, अकाेला बसेसवर गर्दी दिसून आली. निर्जंतुक केलेल्या सर्व बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आल्या आहेत. प्रवासी बसमध्ये चढत असताना, गाडी सुरू झाल्यानंतर प्रवाशांनी मास्क, सॅनिटायझर वापरणे व शासकीय आरोग्यविषयक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे, अशा सूचना देण्यात येत आहेत. अनेक दिवसांपासून बंद असलेल्या बसेस सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये आनंद दिसून आला.
-----------------
1. प्रवाशांच्या मागणीनुसार बसेसचे नियाेजन
बस आगारातर्फे प्रवाशांच्या मागणीनुसार बसेसचे नियाेजन करण्यात येत आहे. जास्त प्रवासी एखाद्या गावातील असल्यास बस साेडण्यात येत आहे.
2. निर्जंतुक केलेल्या बसेस प्रवाशांच्या सेवेत
काेराेना संसर्ग पाहता प्रवाशांची काळजी घेण्याच्या दृष्टीने निर्जंतुक करण्यात आलेल्या बसेस प्रवाशांसाठी साेडण्यात येत असल्याचे दिसून आले.
3. प्रवास भाड्यात काेणतीच वाढ नाही
पेट्राेलच्या दरात वाढ झाल्याने, बस प्रवास भाड्यात वाढ झाली असावी, असे प्रवाशांना वाटत हाेते. मात्र, बसभाड्यात काेणत्याच प्रकारची वाढ करण्यात आली नाही
------------------
पार्किंगमध्ये दिसू लागली वाहने
काेराेनामुळे बंद असलेली बससेवा ७ जूनपासून सुरू करण्यात आल्याने अनेक दिवसांपासून उपासमार आलेल्या पार्किंग संचालकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. पार्किंगमध्ये आपली वाहने प्रवासी ठेऊन प्रवास करीत असल्याचे दिसून आले.
--------
अपडाऊन करणारे कर्मचारीही बसमध्ये
पेट्राेल दरवाढीमुळे स्वत:चे वाहन घेऊन प्रवास करणे परवडण्यासारखे नसल्याने, अनेक शासकीय, निमशासकीय कर्मचारी यांनी बसने प्रवास सुरू केल्याचे दिसून आले. प्रथमच अनेक कर्मचारी बस स्थानकावर भेटल्याचे त्यांच्या चर्चेवरून दिसून आले.