शिबिराच्या अध्यक्षस्थानी साहेबराव तुमसरे हे होते. याप्रसंगी कामरगाव मंडळातील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक व कोतवाल हजर होते. सूत्रसंचालन तथा महसूल विभागाच्या योजनांची माहिती मंडळ अधिकारी देवेंद्र मुकुंद यांनी दिली. कृषीविषयक योजनांची माहिती कृषी सहाय्यक शरद सोळंके यांनी दिली. पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत योजनांची माहिती सचिव गोपाल मिसाळ व आर.डब्ल्यू. राऊत यांनी दिली. कामरगाव मंडळातील तलाठी विनोद नागलकर, निलेश गुगळे, अर्चना चिकटे, वर्षा मोडसे, बालाजी माघाडे यांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाकडून प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले. अर्चना चिकटे यांनी आभार मानले. शिबिराचे आयोजन कोरोनाविषयक नियम व फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून करण्यात आले. यशस्वीतेसाठी कामरगाव मंडळातील कोतवाल गजानन शेगोकार, योगेश घोडसाड, गजानन वानखडे यांनी परिश्रम केले.
कामरगाव येथे विशेष शिबिरास प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2021 4:41 AM