मालेगाव तालुक्यातील सर्वात मोठे आरोग्यवर्धिनी केंद्र म्हणून शिरपूर केंद्राची ओळख आहे. एक लाखापेक्षा अधिक नागरिकांच्या आरोग्याची नीगा राखण्याची जबाबदारी शिरपूर आरोग्यवर्धिनी केंद्रावर आहे. या आरोग्यवर्धिनी केंद्रांतर्गत एकूण ७ उपकेंद्रे आहेत. सध्या शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे तसेच कोरोना चाचण्यांसह लसीकरणाचे कामसुद्धा सुरू आहे. मात्र, आरोग्यवर्धिनी केंद्रात किमान दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची गरज असताना केवळ श्रीधर बळी हे एकमेव वैद्यकीय अधिकारी आरोग्यवर्धिनी केंद्राचा डोलारा सांभाळत आहे. याचा रुग्णसेवेसह इतर कामकाजावरही परिणाम होत आहे. त्यामुळे शिरपूर आरोग्यवर्धिनी केंद्रात आणखी एका वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक करणे गरजेचे झाले आहे तसेच बाहेरगावाहून अपडाऊन करणाऱ्या आरोग्यवर्धिनी केंद्रातील इतर कर्मचाऱ्यांनासुद्धा मुख्यालयी राहण्याचे सक्तीचे आदेश देणे गरजेचे आहे.
एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यावर आरोग्यवर्धिनी केंद्राची जबाबदारी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 4:39 AM